ऑलिंपिक स्पर्धेदरम्यान टोकियोत आणीबाणी?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 July 2021

टोकियो तसेच जपानच्या अन्य प्रांतात कोरोना रुग्ण वेगाने वाढत असल्याने पुन्हा आणीबाणी जाहीर करण्याचा जपान सरकारचा विचार आहे. यामुळे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा होत असताना टोकियोत आणीबाणी असण्याची शक्यता आहे.

टोकियो - टोकियो तसेच जपानच्या अन्य प्रांतात कोरोना रुग्ण वेगाने वाढत असल्याने पुन्हा आणीबाणी जाहीर करण्याचा जपान सरकारचा विचार आहे. यामुळे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा होत असताना टोकियोत आणीबाणी असण्याची शक्यता आहे. 

टोकियोत बुधवारी कोरोनाचे नवे ९२० रुग्ण आढळले. मे महिन्यापासूनचे एका दिवसातील हे सर्वाधिक रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे टोकियोत आणीबाणी जाहीर करण्याचा जपान सरकारचा विचार आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान यशिहिदे सुगा हे गुरुवारी करण्याची शक्यता आहे. टोकियोत सध्या आणीबाणी सदृश निर्बंध आहेत. ते अधिक कठोर होतील तसेच ते ऑलिंपिक स्पर्धा संपेपर्यंत कायम असतील, असेही सांगितले जात आहे. 

जपानमधील वरिष्ठ मंत्र्यांची आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह चर्चा सुरू आहे. 

जपान किनाऱ्यावर जोरदार पाऊस?
जपानच्या हवामान खात्याने देशाच्या किनारपट्टीच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिमेन आणि तात्तोरी राज्यातील अनेकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. इझुमो येथे एका तासात ७५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.


​ ​

संबंधित बातम्या