ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत काम करणारे पाच कर्मचारी बाधित
ब्राझील संघाचा मुक्काम असलेल्या हॉटेलमधील आठ कर्मचारी बाधित आढळल्यानंतर आता ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत विविध ठिकाणी काम करणारे कंत्राटदार बाधित आढळले आहेत. त्यात स्टेडियम निगराणीची जबाबदारी असलेले कर्मचारी बाधित आढळल्याने चिंता वाढली आहे.
टोकियो - ब्राझील संघाचा मुक्काम असलेल्या हॉटेलमधील आठ कर्मचारी बाधित आढळल्यानंतर आता ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत विविध ठिकाणी काम करणारे कंत्राटदार बाधित आढळले आहेत. त्यात स्टेडियम निगराणीची जबाबदारी असलेले कर्मचारी बाधित आढळल्याने चिंता वाढली आहे.
ऑलिंपिक स्पर्धेसाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास बाधितांची संख्या खूपच कमी असल्याचे सांगितले जात आहे, पण स्पर्धेशी संबंधीत बाधित वाढत असल्याने हा धोक्याचा इशारा समजला जात आहे.
ऑलिंपिकसाठी काम करीत असलेले चार कंत्राटदार, एक कर्मचारी, तसेच एक खेळाडू बाधित आढळल्याचे संयोजकांनी सांगितले. याबाबत अतिरिक्त माहिती देण्यास संयोजकांनी नकार दिला. दरम्यान, ब्राझील संघ मुक्कामास येण्यापूर्वी झालेल्या चाचणीत हॉटेलमधील आठ कर्मचारी बाधित आढळले होते.