आधी महिलांचा अपमान; आता महिलाच पाहणार ऑलिम्पिकचा कारभार

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 19 February 2021

माजी पंतप्रधान मोरी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याऐवजी पुरुषाची निवड होणार ही चिन्हे होती, पण त्यांनी खासगीत महिलांचा अवमान करणारी वक्तव्ये केली होती, त्यामुळे त्यांच्याऐवजी हाशिमोतो यांना पसंती देण्यात आली असल्याची चर्चा आहे. 

टोकियो : मिटिंगमध्ये महिला असतील, तर त्यांच्या बोलण्यावर वेळेची मर्यादा असावी, या वक्तव्यामुळे ऑलिंपिक संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता आम्ही महिलांना समान आधिकारच देतो हे दाखवण्यासाठी जपानने संयोजन समितीच्या अध्यक्षपदी ऑलिंपिक खेळाडू सैको हाशिमोतो यांची नियुक्ती केली. 

माजी ऑलिंपिक मंत्री हाशिमोतो यांनी सात ऑलिंपिक स्पर्धांत जपानचे प्रतिनिधित्व केले आहे. माजी पंतप्रधान मोरी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याऐवजी पुरुषाची निवड होणार ही चिन्हे होती, पण त्यांनी खासगीत महिलांचा अवमान करणारी वक्तव्ये केली होती, त्यामुळे त्यांच्याऐवजी हाशिमोतो यांना पसंती देण्यात आली असल्याची चर्चा आहे. 

महिलांच्या बडबडीवरील वक्तव्य नडले; ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षांचा राजीनामा

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांत संयोजन समितीच्या बैठकीत हाशिमोतो यांनी आपल्या नियुक्तीची घोषणा केली. स्पर्धेपूर्वी केवळ काही महिने त्यांच्यावर ही जबाबदारी आली आहे. 1964 चे जपानमधील ऑलिंपिक सुरू होण्यापूर्वी काही दिवस जन्मलेल्या हाशिमोतो यांचे नाव हे ऑलिंपिक ज्योतीसाठी वापरण्यात येणाऱ्या चीनी अक्षरावरून ठेवण्यात आले आहे. त्यांनी चार हिवाळी आणि तीन उन्हाळी ऑलिंपिकमध्ये जपानचे प्रतिनिधित्व केले. 

IPL 2021 Auction : क्रिस मॉरिस ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

जपानच्या सत्ताधारी पक्षाच्या कायदेमंडळात असलेल्या हाशिमोतो या ऑलिंपिक मंत्री होत्या, तसेच त्यांच्याकडे महिला विकासाची जबाबदारीही होती. मातृत्व रजा घेतलेल्या त्या जपानमधील पहिल्या राजकीय नेत्या आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार मोहीम उघडली होती.


​ ​

संबंधित बातम्या