खेळाडूंच्या छळवणुकीचा आरोप; जिम्नॅस्टिक मार्गदर्शकाची आत्महत्या

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 27 February 2021

गेडार्ट यांनी 13 ते 16 वयोगटातील मुलींची छळवणूक केली. त्यांना क्षमतेपेक्षा जास्त मेहनत करण्यास भाग पाडले. त्यांनी दुखापत झालेल्या खेळाडूंनाही सराव करण्यास भाग पाडले.

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या जिम्नॅस्टिक महिला संघाचे मार्गदर्शक जॉन गेडार्ट यांनी आत्महत्या केली आहे. खेळाडूंची शारीरिक छळवणूक केल्याचा तसेच त्यांना शिवीगाळ केल्याबद्दल त्यांच्यावर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर काही तासांतच जॉन यांनी आत्महत्या केली.

गेडार्ट यांनी 13 ते 16 वयोगटातील मुलींची छळवणूक केली. त्यांना क्षमतेपेक्षा जास्त मेहनत करण्यास भाग पाडले. त्यांनी दुखापत झालेल्या खेळाडूंनाही सराव करण्यास भाग पाडले. चांगली कामगिरी न केलेल्या खेळाडूंना शिवीगाळ केली होती, असे आरोप त्यांच्यावर होते. गेडार्ट हे पोलिसांसमोर शरण येतील, ही घोषणा झाल्यानंतर काही तासांतच त्यांच्या आत्महत्येचे वृत्त देण्यात आले. 

Vijay Hazare Trophy 2021 : देवदत्तचा धमाका थांबत नसतो; सलग दुसऱ्या शतकासह स्पर्धेतील टॉपर

मिशिगन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  गेडार्ट यांचा मृतदेह 3.20 मिनिटांनी लेनसिंग जवळील हायवे रेस्ट परिसरात आढळला. आत्महत्येच नेमकं कारण अद्याप समोर आले नसून पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. गेडार्ट यांना 2018 मध्ये प्रशिक्षक पदावरुन निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी अचानक निवृत्तीची घोषणा केली होती. त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले होते ते खूपच गंभीर होते. याप्रकरणी  एटन काउंटी कोर्टमध्ये खटला सुरु होता. जर ते दोषी आढळले असते तर त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली असती.  भारत भारत भारत 


​ ​

संबंधित बातम्या