फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस हॅमिल्टनला कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

फॉर्म्युला वन रेसिंग आणि मर्सिडीस संघातील चालक लुईस हॅमिल्टनला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी मिळाली आहे.

फॉर्म्युला वन रेसिंग आणि मर्सिडीस संघातील चालक लुईस हॅमिल्टनला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी मिळाली आहे. व त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस बहारीन मध्ये होत असलेल्या साखिर ग्रांप्रि स्पर्धेत लुईस हॅमिल्टनला मुकावे लागणार आहे. लुईस हॅमिल्टनचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे आज फॉर्म्युला वनकडून सांगण्यात आले. 

भारतीय तिरंदाज कपिलला कोरोना विषाणूची लागण

लुईस हॅमिल्टन हा कोरोनाच्या चाचणीत सकारात्मक आढळल्यामुळे बहारीन मधील नियमानुसार तो क्वारंटाईन झाला असल्याचे फॉर्म्युला वनने आपल्या निवेदनात सांगितले. तसेच लुईस हॅमिल्टन व्यतिरिक्त इतर कोणताही चालक कोरोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले असून, ठरलेल्या नियोजित वेळेनुसारच साखिर ग्रांप्रि स्पर्धा होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

फॉर्म्युला वनमधील धोका पुन्हा अधोरेखित 

याशिवाय सोमवारी लुईस हॅमिल्टनमध्ये कोरोनाची काही लक्षणे दिसून आली. व त्याच वेळेस स्पर्धेपूर्वी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे मर्सिडीस संघाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. शिवाय यावेळी पुन्हा करण्यात आलेल्या चाचणीत देखील लुईस हॅमिल्टनला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मर्सिडीसच्या व्यवस्थापनाने दिली. तसेच कोरोनाची थोडीफार लक्षणे त्याच्यात दिसून आली असून, याव्यतिरिक्त तो तंदरुस्त असल्याचे मर्सिडीसने म्हटले आहे. 

दरम्यान, यापूर्वी झालेल्या तुर्कीश ग्रांप्रि शर्यतीत लुईस हॅमिल्टनने अव्वल क्रमांक मिळवला होता. या स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यावर लुईस हॅमिल्टनने विक्रमी सातव्यांदा फॉर्म्युला वन मालिकेतील सर्वांगीण विजेतेपद जिंकले होते. त्याचबरोबर सर्वाधिक सात वेळा सर्वांगीण विजेतेपद जिंकण्याच्या मायकेल शूमाकरच्या विक्रमाशी त्याने बरोबरी साधली होती.  


​ ​

संबंधित बातम्या