फॉर्म्युला वन मालिकेतील आघाडीवरील वेर्स्तापनला अपघात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 June 2021

विजेतेपद जवळपास निश्चित दिसत असताना मार्क वेर्त्सापेनची कार पंक्चर झाली आणि काही वेळातच तिला अपघात झाला. विजेतेपद जिंकण्याची संधी असताना लुईस हॅमिल्टनकडून चूक झाली आणि या फॉर्म्युला वन मालिकेतील नाट्यमय अझरबैझान ग्राप्रि शर्यतीत सर्गिओ पेरेझ अव्वल आला.

बाकू - विजेतेपद जवळपास निश्चित दिसत असताना मार्क वेर्त्सापेनची कार पंक्चर झाली आणि काही वेळातच तिला अपघात झाला. विजेतेपद जिंकण्याची संधी असताना लुईस हॅमिल्टनकडून चूक झाली आणि या फॉर्म्युला वन मालिकेतील नाट्यमय अझरबैझान ग्राप्रि शर्यतीत सर्गिओ पेरेझ अव्वल आला.

पाच फेऱ्या शिल्लक असताना वेर्स्तापन सहज बाजी मारणार तसेच सर्वांगीण विजेतेपदाच्या शर्यतीतील आघाडी वाढवण्याचीच स्पष्ट चिन्हे दिसत होती. अचानक त्याची कार पंक्चर झाली. त्यामुळे त्याला तेराव्या विजेतेपदापासून वंचितच राहावे लागले नाही, तर त्याची कार क्रॅश झाल्यामुळे त्याला शर्यतही सोडावी लागली. या अपघातामुळे शर्यतीत ब्रेक घेण्यात आला होता.

वेर्स्त्पापनला शर्यत सोडावी लागल्यामुळे हॅमिल्टनला विजेतेपद तसेच आघाडी खुणावू लागली, पण शर्यत पुन्हा सुरू झाल्यावर हॅमिल्टनच्या ब्रेकमधून धूर येण्यास सुरुवात झाली. हे त्याच्याच चूकीमुळे घडले होते. पेरेझला मागे ठेवण्याच्या प्रयत्नात तसेच वेगही नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याने तो शर्यतीचा मार्ग सोडून बाहेर गेला आणि त्याला पिछाडीवर जावे लागले. त्याचा फायदा घेत वेर्स्तापनचा सहकारी पेरेझने बाजी मारली. यामुळे वेर्स्तापनचे सर्वांगीण क्रमवारीतील अग्रस्थान कायम राहिले.


​ ​

संबंधित बातम्या