Formula 1 Champion ला नाईटहूड पुरस्कार; हॅमिल्टनच्या नावाआधी 'सर' लागणार

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 31 December 2020

सात वेळचा वर्ल्ड चॅम्पियन हॅमिल्टनने आतापर्यंत 95 शर्यती जिंकल्या आहेत. नाईटहुड पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्या नावाआधी 'सर' ही उपाधी लागेल. ही पंरपरा ब्रिटनमध्ये मध्यकाळापासून चालत आली आहे. मोजक्या लोकांनाचा हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो.  

Formula One world champion : स्पर्धेत सातत्याने सातवेळा बाजी मारुन जगातला नंबर वन आणि यशस्वी फार्मुला वन चालक असल्याचे सिद्ध करणाऱ्या ब्रिटनच्या लुईस हॅमिल्टनच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला जाणार आहे. हेमिल्टनला नाईटहूड या प्रसिद्ध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ब्रिटनच्या लईस हॅमिल्टनने यंदाच्या वर्षी जर्मीनीचा दिग्गज फार्मुला वन रेसर मायकल शूमाकरच्या सर्वाधिक 91 शर्यतीचा विक्रम मागे टाकला होता. नाईटहूड हा ब्रिटनमधील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून या पुरस्काराने हॅमिल्टनला गौरवण्यात येणार आहे.  

सात वेळचा वर्ल्ड चॅम्पियन हॅमिल्टनने आतापर्यंत 95 शर्यती जिंकल्या आहेत. नाईटहुड पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्या नावाआधी 'सर' ही उपाधी लागेल. ही पंरपरा ब्रिटनमध्ये मध्यकाळापासून चालत आली आहे. मोजक्या लोकांनाचा हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो.  

AUSvsIND: रोहित IN उमेश Out; टीम इंडियाच्या ताफ्यात 'कही खुशी कही गम'चा खेळ

नाईटहुड पुरस्काराने सन्मानित होणारा सहावा फार्म्युला वन चालक 
लुईस हॅमिल्टनपूर्वी काही अन्य फार्म्युला वन चालकांना नाईटहुड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यात  सर जॅकी स्टीवर्ट, सर स्टर्लिंग मॉस, सर फ्रँक विलियम्स, सर पॅट्रिक हेड आणि सर जॅक बॉथम यांचा समावेश आहे. हॅमिल्टन हा पुरस्काराने सन्मानित होणारा सहावा फार्म्युला वन चालक आहे. 

NZvsPAK : पाकचा करामती कॅप्टन! न्यूझीलंडला खेळायला गेलाय की नाचायला?

2020 हे वर्ष हॅमिल्टनसाठी नव्या नव्या विक्रमाला गवसणी घालणारे असेच राहिले. याच वर्षी त्याने सातव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर  मर्सेडीजच्या टीमलाही सलग सातव्यांदा कार निर्माण करणारी यशश्वी कंपनी असा बहुमान मिळाला होता.   

 


​ ​

संबंधित बातम्या