गोव्याच्या 14 वर्षीय लियोनची कमाल; वर्षाअखेरीस भारताला मिळाला 67 ग्रँडमास्टर

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 31 December 2020

त्याने ऑक्टोबरमध्ये रिजो बुद्धिबळ जीएम राउंड रॉबिनमध्ये पहिल्या नॉर्म प्राप्त केला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये बुडापेस्टमध्ये दूसरा आणि इटलीतील वेरजानी कपमध्ये तिसरा आणि अखेरचा नॉर्म पूर्ण केला.

भारताला वर्षाच्या अखेरीला आणखी एक ग्रँडमास्टर मिळाला आहे. गोव्याच्या 14 वर्षीय लियोन मेंडोकाने इटलीतील स्पर्धेत तिसरा आणि अखेरचा नॉर्म प्राप्त करुन त्याने भारताचा 67 वा ग्रँडमास्टर होण्याचा पराक्रम केला. 14 वर्ष 9 महिने आणि 17 दिवस वयात त्याने हा बहुमान मिळवला. 

त्याने ऑक्टोबरमध्ये रिजो बुद्धिबळ जीएम राउंड रॉबिनमध्ये पहिल्या नॉर्म प्राप्त केला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये बुडापेस्टमध्ये दूसरा आणि इटलीतील वेरजानी कपमध्ये तिसरा आणि अखेरचा नॉर्म पूर्ण केला. इटलीतील स्पर्धेत तो  यूक्रेनच्या विताली बर्नाडस्कीनंतर दुसऱ्या स्थानावर राहिला. 

NZvsPAK : पाकचा करामती कॅप्टन! न्यूझीलंडला खेळायला गेलाय की नाचायला?

मेंडोंका आणि त्याचे वडील लिंडोन कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर ओढावलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत युरोपात अडकले होते. यादरम्यान त्यांनी अनेक स्पर्धेत भाग घेतला. आणि ग्रँडस्लॅम होण्याच्या दिशेने आगेकूच केली. मेंडोंकाने मार्च ते डिसेंबर दरम्यान 16 स्पर्धेत भाग घेतला. त्याची एलो रेटिंग 2452 अंकावरुन 2544 वर पोहचली आहे.  


​ ​

संबंधित बातम्या