WWE च्या रिंगणात गोल्डबर्गची एन्ट्री; 'कॅमबक'चे संकेत देत चॅम्पियनला दिलं चॅलेंज

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 5 January 2021

तू स्वत:ला खूप ताकदवान समजतो, पण तो तुझा भ्रम आहे, असे म्हणत गोल्डबर्गने रिंगमध्ये मँकइंटायरला  डोक्याने टक्कर दिली आणि सामना खेळण्याचे चॅलेंजही दिले.

WWE आणि रेसलिंगच्या मैदानातील दिग्गज बिल गोल्डबर्ग पुन्हा एकदा रिंगमध्ये परतला आहे. सोमवारी झालेल्या Raw नाईटच्या कार्यक्रमात तमाम दिग्गजांनी भाग घेतला होता. मेन इव्हेंटनंतर गोल्डबर्गने एन्ट्री मारली. गोल्डबर्ग रेसलिंग बिझनेसमधील सर्वात मोठे नाव आहे. त्याने सातत्यपूर्ण 173 विजय मिळवले आहेत. गोल्डबर्गच्या एन्ट्रीनंतर त्याचे नाव सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. 

Raw मध्ये WWE चँम्पियन ड्रू मॅकइंटायर आणि कीथ ली यांच्यात लढत रंगली होती. अनेक दिग्गज स्टेजवरुन या सामन्याचा आनंद घेत होते. यात हल्क होगन, बुकर टी, बिग शो, रिक फ्लेयर आणि मिकी जेम्ससह अन्य सुपरस्टार्स सहभागी होते. मेन इव्हेंटमधील सामना रंगतदार झाला आणि अखेर चॅम्पियन ड्रू मॅकंटायरने मैदान मारले. ही लढत संपली आणि गोल्डबर्गची एन्ट्री झाली. यावेळी रिंगमध्ये येऊन गोल्डबर्गने विजेत्या ड्र मँकइंटायरवर शाब्दिक हल्ला चढवला.

रोमन रेंसने घेतला भावाचा बदला; कविनची अवस्था केली केविलवाणी

तू स्वत:ला खूप ताकदवान समजतो, पण तो तुझा भ्रम आहे, असे म्हणत गोल्डबर्गने रिंगमध्ये मँकइंटायरला  डोक्याने टक्कर दिली आणि सामना खेळण्याचे चॅलेंजही दिले. रिंगमध्ये झालेल्या या बाचाबाचीमुळे 31 जानेवारीला WWE च्या रिंगमध्ये गोल्डबर्ग आणि ड्रू मँकइंटायर यांच्यात RAW चॅम्पियनशिप मॅच होण्याची चर्चा रंगत आहे. रॉयल रम्बलमध्ये या दोघांच्या लढत होईल यासंदर्भात WWE कडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. 

गोल्डबर्गने 2004 पासून WWE च्या रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 2016 मध्ये  सर्वाइवर सीरीजमध्ये ब्रॉक लँसनर विरोधील मॅचमधून त्याने पुन्हा कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले होते. लँसनरला त्याने पराभूतही केले. 2017 मध्ये  केविन ओवेंसला नमवत त्याने यूनिवर्सल चॅम्पिनयशिप आपल्या नावे केली होती. रेसलमेनिया 33 मध्ये ब्रॉक लँसनरने गोल्डबर्गला पराभूत केले होते. भारत भारत 


​ ​

संबंधित बातम्या