रोजगार निर्मितीचा मास्टर प्लॅन; सरकार उभारणार 1000 'खेलो इंडिया' केंद्र 

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 11 December 2020

खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही. पण आपला देश हा खेळासाठी ओळखला जात नाही. त्यामुळे सरकारचे प्रयत्न परेसे ठरणार नाहीत. देशातील लोकांचा पाठिंबा, त्यांचे योगदान खेळ संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, असेही ते म्हणाले. 

निवृत्त झालेल्या खेळाडूंना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने भारत सरकार नवा आराखडा तयार केलाय. क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांनी नुकतीच यासंदर्भात माहिती दिली. खेलो इंडियाच्या अंतर्गत निवृत्त खेळाडूंच्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. देशात 1000 खेलो इंडिया केंद्राची स्थापना करण्यात येणार असून यात दिग्गज खेळाडूंना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. भारत सरकारच्या या निर्णयामुळे देशातील खेळ संस्कृतीच्या विकासाला चालणा मिळेल, असा विश्वासही क्रीडा मंत्र्यांनी व्यक्त केलाय.  

खेळाचे मैदानात लक्षवेधी खेळी करुन देशाचे नाव उंचावणारा खेळाडू ज्यावेळी हताश दिसतो त्यावेळी खेळाकडे वळलेल्या नवोदित खेळाडूंमध्येही निरुत्साहाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे निवृतीनंतर खेळाडूला योग्य सन्मान देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. याशिवाय खेळाडू आणि लाभार्थी यांना बक्षिस स्वरुपात मिळणारे मानधन थेट त्यांना प्राप्त होईल, अशी व्यवस्था करण्यासंदर्भातही सरकार प्रयत्नशील असल्याचे क्रिडा मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

हिटमॅन फिट है! टेस्ट पास झालेला रोहित प्लाइट कधी पकडणार?

उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील दिग्गजांनी देखील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यास पुढे यावे, असे आवाहनही किरेन रिजिजू यांनी यावेळी केले. खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही. पण आपला देश हा खेळासाठी ओळखला जात नाही. त्यामुळे सरकारचे प्रयत्न परेसे ठरणार नाहीत. देशातील लोकांचा पाठिंबा, त्यांचे योगदान खेळ संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, असेही ते म्हणाले. 


​ ​

संबंधित बातम्या