ऑलिम्पिकसाठी हॉकी इंडियाने घेतला मोठा निर्णय

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 5 January 2021

क्लार्क यांनी 11 वर्षांच्या कारकिर्दीत 250 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यांनी आपल्या संघाकडून दोन वर्ल्डकपसह दोन ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. 

ऑलिम्पिक स्पर्धत दममदार आणि लक्षवेधी खेळ करण्यासाठी भारतीय पुरुष हॉकी संघाची जोरदार तयारी सुरु आहे. जगातील मानाच्या स्पर्धेत उतरण्यापूर्वी इंडियन हॉकीने मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी ऑलिम्पिकपटू ग्रेग क्लार्क यांची संघाच्या अ‍ॅनालिटीकल कोचपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मंगळवारी हॉकी इंडियाने यासंदर्भातील घोषणा केली. क्लार्क या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय कॅम्पवेळी संघाला जॉईन होतील. यापूर्वी त्यांनी 2013-14 मध्ये भारतीय ज्यूनिअर पुरुष हॉकी संघाला मार्गदर्शन केले होते.    

त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय ज्यूनिअर संघाने सुल्तान जोहोर कप जिंकला होता. तसेच 2013 मध्ये संघाने एफआयएच ज्यूनिअर वर्ल्डमध्येही सहभाग घेतला होता.  2017 ते 2020 या कालावधीत ग्रेग क्लार्क यांनी कॅनडाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाची धूरा सांभाळली आहे.  हॉकी इंडियाच्या ताफ्यास सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया ग्रेग क्लार्क यांनी दिली आहे. यापूर्वी भारतीय हॉकीसोबत काम केल्याचा अनुभव आगामी काळात कामी येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.  

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

2013 मध्ये ज्यूनिअर टीममधील ज्या खेळाडूंना मार्गदर्शन केले होते त्यातील अनेक खेळाडू सीनिअर टीमच्या संघात आहेत. त्यांना मोठा अनुभव आहे, असे म्हणत हॉकी पुरुष संघाचे त्यांनी कौतुकही केले आहे. क्लार्क यांनी 11 वर्षांच्या कारकिर्दीत 250 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यांनी आपल्या संघाकडून दोन वर्ल्डकपसह दोन ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या