हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी ज्ञानेंद्रो निंगोम्बाम यांची निवड 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी मणिपूरच्या ज्ञानेंद्रो निंगोम्बाम यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी मणिपूरच्या ज्ञानेंद्रो निंगोम्बाम यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रीय क्रीडा संहिता कार्यकाळातील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे अहमद यांना क्रीडा मंत्रालयाने राजीनामा देण्यास सांगितले होते. तर हॉकी इंडिया कॉंग्रेस आणि इलेक्शन मध्ये अहमद यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. 

Covid 19 : गौतम गंभीर होम क्वारंटाईन; सोशल मीडियावरुन दिली माहिती

कोरोनाच्या महामारीमुळे सर्व सदस्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीस उपस्थिती लावली होती. हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड होणारे निंगोम्बाम  हे ईशान्येकडील पहिले सदस्य आहेत. जुलै महिन्यात अहमद यांनी वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणास्तव राजीनामा दिल्यानंतर ते कार्यवाह अध्यक्ष होते.

कोरोनातून रोनाल्डो सावरला आणि ज्युव्हेंट्सचा संघही 

क्रीडा मंत्रालयाने अहमद यांना राजीनामा देण्यास सांगितले होते कारण त्यांची 2018 मधील निवडणूक राष्ट्रीय क्रीडा संहितेच्या कार्यकाळातील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करीत होती. याशिवाय महासंघाला अध्यक्षपदासाठी नव्याने निवडणुका घेण्यास क्रीडा मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. राष्ट्रीय क्रीडा संहितेअंतर्गत कोणताही अधिकारी सलग तीन वेळा एकाच पदावर राहू शकत नाही. अहमद हे 2010 ते 2014 पर्यंत हॉकी इंडियाचे खजिनदार होते. त्यानंतर 2014 मध्ये ते सरचिटणीस झाले आणि 2018 मध्ये चार वर्षांसाठी अध्यक्षपदावर निवडले गेले होते. 
 


​ ​

संबंधित बातम्या