...म्हणून बजरंग पुनियानं घेतला सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 March 2021

बजरंगने 2019 च्या जागतिक स्पर्धेतून ऑलिंपिकची पात्रता मिळवली आहे. अमेरिकेतील एका महिन्याच्या प्रशिक्षणानंतर तो मायदेशात परतला आहे. 

मुंबई : ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्यासाठी बजरंग पुनियाने स्पर्धा होईपर्यंत समाज माध्यमांपासून दूर राहण्याचे ठरवले आहे. ऑलिंपिक परीक्षेच्या अभ्यासासाठी बजरंगने हा निर्णय घेतल्याची चर्चा कुस्ती वर्तुळात सुरू झाली आहे. 

आजपासून मी माझे सर्व समाज माध्यमांवरील अकाऊंट बंद करीत आहे. आता या माध्यमातून आपली भेट ऑलिंपिकनंतरच होईल. तुमच्या शुभेच्छा, तुमचे प्रेम माझ्यासोबत कायम राहील, ही अपेक्षा आहे, असे ट्‌विट बजरंगने केले आहे. बजरंगने 2019 च्या जागतिक स्पर्धेतून ऑलिंपिकची पात्रता मिळवली आहे. अमेरिकेतील एका महिन्याच्या प्रशिक्षणानंतर तो मायदेशात परतला आहे. 

Table Tennis : नाशिकची सायली राष्ट्रीय विजेती

बजरंग पुनिया एक प्रसिद्ध कुस्तीपटू आहे. तो फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करतो. भारताच्या दिग्गज पैलवानांपैकी तो एक असून सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याने वयाच्या 7 वर्षी आखाड्यात पाय ठेवला होता. बजरंगने 2013 मध्ये आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमधील जेतेपद हे त्याच्या कारकिर्दीतील आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिली सर्वोच्च कामगिरी ठरली होती. 

आफ्रिदीचा वय लपवाछपवीचा खेळ; 16 व्या वर्षी शतक झळकावल्याचा खोटेपणा उघड

यास्पर्धेत त्याने कांस्य पदक पटकावले होते. त्यानंतर बजरंगने राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा, आणि अन्य राष्ट्रीय स्पर्धेत दिमाखदार कामगिरी केली आहे. आखाड्यातील लक्षवेधी कामगिरीमुळे 2015 मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  2019 मध्ये त्याचा पद्मश्री पुरस्कारानेही गौरव करण्यात आला आहे.   


​ ​

संबंधित बातम्या