पुरस्कर्त्यांच्या नाराजीची ऑलिंपिकसाठी डोकेदुखी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 June 2021

स्थानिक पुरस्कर्त्यांच्या भक्कम आर्थिक पाठबळाच्या जोरावर ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्याची जपानची योजना आहे; पण ३२० कोटी डॉलरचा एकत्रित पुरस्कार दिलेल्या ६० हून जास्त कंपन्यांना स्पर्धा होणार का, झाली तर त्याचे काय स्वरूप असणार, याची काहीही कल्पना नाही.

टोकियो - स्थानिक पुरस्कर्त्यांच्या भक्कम आर्थिक पाठबळाच्या जोरावर ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्याची जपानची योजना आहे; पण ३२० कोटी डॉलरचा एकत्रित पुरस्कार दिलेल्या ६० हून जास्त कंपन्यांना स्पर्धा होणार का, झाली तर त्याचे काय स्वरूप असणार, याची काहीही कल्पना नाही. 

असाही ब्रुवरीज या कंपनीसमोर प्रश्न सर्व चित्र स्पष्ट करते. त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी बिअर तसेच अल्कोहोलविना असलेली पेय पुरवण्याचे हक्क मिळाले आहेत; पण प्रेक्षकांना प्रवेशच नसेल, तर आपल्या उत्पादनाची विक्री कशी होणार, हा त्यांच्यासमोरील प्रश्न आहे. स्पर्धेच्या ठिकाणी प्रेक्षकांना प्रवेश असणार का, त्यांच्या प्रश्नास २० जूनपर्यंत प्रतीक्षा करा, असे सांगितले जात आहे; मात्र याच दिवशी याबाबतची घोषणाही होणार आहे, याकडे कंपनीचे अधिकारी लक्ष वेधतात. 

ऑलिंपिकसाठी जपानमधील कंपन्यांनी एकत्रितपणे ३ अब्ज डॉलरचा पुरस्कार दिला. स्पर्धा लांबणीवर पडल्यावर त्यांनी अतिरिक्त २० कोटी डॉलर दिले; पण कोणताही निर्णय लगेच घेतला जात नाही. आम्हाला माफक निर्णयासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागते, अशी तक्रार काही पुरस्कर्त्यांनी संयोजकांकडे केली आहे.


​ ​

संबंधित बातम्या