"लस घेणार नाही, त्यापेक्षा ऑलिंपिक सोडेन"

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 March 2021

कोविडवरील लस घेण्यासाठी आम्ही खेळाडूंना प्रोत्साहित करू, परंतु ती कोणलाही अनिवार्य नसेल, अशी भूमिका ऑलिंपिक समितीने जाहीर केलेली आहे.

जमैका : कोरोनावरची कोणतीही लस मी घेणार नाही. लस घेण्यापेक्षा मी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत न खेळणे पसंत करेन, असे ठाम मत जमैकाचा ऑलिंपिक विजेता स्प्रिंटर योहान ब्लेकने व्यक्त केले आहे. लस घेणे चांगले आहे, परंतु लस घेतलेल्याच खेळाडूंना ऑलिंपिकमध्ये खेळता येईल, असे बंधनकारक नसल्याचे ऑलिंपिक समितीने जाहीर केलेले आहे.

आफ्रिदीचा वय लपवाछपवीचा खेळ; 16 व्या वर्षी शतक झळकावल्याचा खोटेपणा उघड

माझी मानसिकता कणखर आहे, मला कोविडवरील लसीची गरज नाही, त्यापेक्षा मी ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार नाही, असे मत ब्लेकने व्यक्त केल्याचे जमैकात्या दी ग्लिनर या वर्तमानपत्राने म्हटले आहे. मी लस घ्यावी की न घ्यावी हे माझे वैयक्तिक मत आहे. योहान ब्लेक हा त्याच्याच जमैका बेटावरील उसेन बोल्टचा स्पर्धक आणि सहकारीही होता. 31 वर्षीय ब्लेकसाठी यंदाची ऑलिंपिक अखेरची मोठी  स्पर्धा असण्याची शक्‍यता आहे. 

कोविडवरील लस घेण्यासाठी आम्ही खेळाडूंना प्रोत्साहित करू, परंतु ती कोणलाही अनिवार्य नसेल, अशी भूमिका ऑलिंपिक समितीने जाहीर केलेली आहे. इतरांच्या विचाराने नको, तुमच्या विचाराने पुढे जा. त्याच वेळी एकमेकांचा आदर बाळगा, असे ब्लेकने म्हटले आहे. जमैकामध्ये पुढच्या आठवड्यात कोरोनावरील लसीचा साठा येणार आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यानंतर जमैकामध्ये ॲथलेटिक्‍स शर्यती सुरू झाल्या आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या