ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची शक्यता असलेली खेळाडू डोपिंगमध्ये दोषी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 March 2021

 टोकियो ऑलिंपिकमध्ये पात्रता मिळवण्याची शक्‍यता असलेले दोन ॲथलेटिक्‍सपटू नाडाने (राष्ट्रीय उत्तेजक चाचणी एजन्सी) घेतलेल्या उत्तेजक चाचणीत दोषी आढळले आहेत. 

नवी दिल्ली - टोकियो ऑलिंपिकमध्ये पात्रता मिळवण्याची शक्‍यता असलेले दोन ॲथलेटिक्‍सपटू नाडाने (राष्ट्रीय उत्तेजक चाचणी एजन्सी) घेतलेल्या उत्तेजक चाचणीत दोषी आढळले आहेत. नाडाचे सरसंचालक नवीन अगरवाल यांनी ही माहिती उघड केली. गेल्या महिन्यात पतियाळा यथे झालेल्या इंडियन ग्रांप्री स्पर्धेत खेळलेल्या सर्व प्रमुख खेळाडूंची चाचणी करण्यात आली.

या दोन खेळाडूंमध्ये एक नावाजलेली महिला खेळाडू आहे. तिने ४ बाय ४०० रिलेमध्ये काही स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवलेली आहेत. टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरू शकतील, अशा खेळाडूंत या महिला खेळाडूचा समावेश आहे. नाडा किंवा भारतीय ॲथलेटिक्‍स फेडरेशनने या खेळाडूंचे नाव जाहीर करण्यात नकार दिला.  

हे वाचा - युवराजची अष्टपैलू खेळी; दक्षिण आफ्रिका लिजंड्सला नमवून भारत सेमीफायनलमध्ये

पतियाळा येथे झालेल्या स्पर्धेत आम्ही खेळाडूंचे नमुने घेतले. त्यातून दोन खेळाडू चाचणीत दोषी आढळले आहेत. याहून अधिक माहिती आम्ही देऊ शकत नाही. हे ऑलिंपिक वर्ष आहे. आम्ही संभाव्य खेळाडूंचा संच तयार केला आहे आणि त्यांची चाचणी वारंवार करणार आहोत, असे ॲथलेटिक्‍स फेडरेशनच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

सध्या तरी आम्ही खेळाडूंना प्रश्‍न विचारत आहोत, त्यांच्यावर बंदीचा विचार केलेला नाही. या दोन्ही खेळाडूंना नाडाच्या अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी बोलवण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Edited by : Ashish N. Kadam


​ ​

संबंधित बातम्या