भारतीय तिरंदाज कपिलला कोरोना विषाणूची लागण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

भारतीय तिरंदाज कपिलला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी मिळाली आहे.

भारतीय तिरंदाज कपिलला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी मिळाली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) सोमवारी  कपिलची कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आली असल्याचे सांगितले. लष्करी क्रीडा संस्थेत होत असलेल्या राष्ट्रीय शिबिरात सहभागी झाल्यानंतर घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला असल्याचे साईने स्पष्ट केले. 

फुटबॉल महासंघ निवडणुकीसाठी 21 राज्य संघटना आग्रही? 

तसेच कपिल मध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याचे साईने आपल्या निवेदनात म्हटले असून, त्याच्या आरोग्यावर वैद्यकीय पथक नजर ठेवून असल्याचे साईने नमूद केले. तसेच कपिल क्वारंटाईन होता. व त्याचा इतर कोणाशी संपर्क झाला नसल्याचे माहिती साईने आपल्या निवेदनात दिली आहे. 

'अर्जेंटिनाचा पोषाख' घालत नापोलीचा विजय 

याव्यतिरिक्त कपिल हा मागील अठरा दिवसांपासून सुट्टीवर होता. आणि त्यानंतर पुन्हा राष्ट्रीय शिबिरात दाखल होत असताना त्याची चाचणी करण्यात आली असल्याचे साईने सांगितले. यापूर्वी हिमानी मलिक देखील महिन्याच्या सुरवातीला कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळली होती. तर त्याअगोदर स्टाफ मधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली होती.   


​ ​

संबंधित बातम्या