भारतीय ॲथलेटिक्सला नवी दिशा मिळेल - आदिल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 August 2021

नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिकमध्ये जिंकलेले सुवर्णपदक हे सर्वोच्च असले, तरी जागतिक ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत ४ बाय ४०० मिश्र रिले शर्यतीत जिंकलेले ब्राँझपदक भारतीय ॲथलेटिक्सला नवी दिशा देणारे ठरेल, असे मत भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी व्यक्त केले.

नागपूर - नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिकमध्ये जिंकलेले सुवर्णपदक हे सर्वोच्च असले, तरी जागतिक ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत ४ बाय ४०० मिश्र रिले शर्यतीत जिंकलेले ब्राँझपदक भारतीय ॲथलेटिक्सला नवी दिशा देणारे ठरेल, असे मत भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी व्यक्त केले. 

नैरोबी येथून बोलताना सुमारीवाला म्हणाले, या पदकाचे महत्त्व वेगळे आहे. कारण स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पदक जिंकल्याने इतर खेळाडूंचाही आत्मविश्वास उंचावेल, यात शंका नाही. भारतीय ॲथलिट्‍सने जागतिक पातळीवर जास्तीत जास्त पदके जिंकावीत, यासाठी महासंघाने अठरा वर्षांपूर्वी ज्युनिअर आंतरजिल्हा स्पर्धा सुरू केली. त्याची फळे आता मिळू लागली आहे.

ब्राँझपदक संघातील प्रिया मोहन म्हणाली, जागतिक स्पर्धेत रिले संघाने ब्राँझपदक जिंकल्याने भारतातील अनेक नवोदित खेळाडूंना चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल. अंतिम शर्यतीत आमच्यावर कोणताही दबाव नव्हता. रिलेची प्राथमिक फेरी, वैयक्तिक चारशे मीटरची प्राथमिक फेरी आणि त्यानंतर रिलेची अंतिम फेरी असली, तरी कुठेही थकवा जाणवला नाही, असेही ती म्हणाली.


​ ​

संबंधित बातम्या