Boxing World Cup : बॉक्सिंगच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये अमित पांघल

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 18 December 2020

भारतीय बॉक्सर अमित पांघलने आपली दमदार कामगिरी कायम ठेवली आहे.

भारतीय बॉक्सर अमित पांघलने आपली दमदार कामगिरी कायम ठेवली आहे. मागील वर्षी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात इतिहास रचणाऱ्या अमित पांघलने बॉक्सिंगच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अमित पांघल शिवाय उर्वरित तीन बॉक्सर यांनी मैदानात न उतरताच जर्मनीच्या कोलोन येथे होत असलेल्या वर्ल्ड कप मध्ये पदक निश्चित केले आहेत. 

योगाचा स्पर्धात्मक खेळात समावेश 

एशियन गेम्स चॅम्पियन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक मिळवलेल्या अमित पांघलने (52Kg) सेमीफायनल सामन्यात वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये कास्य पदक मिळवलेल्या फ्रान्सच्या बिलाल बेनामचा पराभव केला आहे. अमित पांघल आणि बिलाल बेनाम यांच्यात झालेल्या लढतीत अमित पांघलने 5-0 अशा फरकाने विजय मिळवला. 

इंग्लिश प्रीमिअर लीग : लिसेस्टर सिटीवर मात करत एव्हर्टन पाचव्या स्थानावर   

याशिवाय, महिला गटात तीन भारतीय बॉक्सर खेळाडूंना ड्रॉ मिळाल्याने त्यांना सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे भारताला अजून तीन पदके निश्चित झाली आहेत. पूजा राणी (75Kg), मनीषा (57Kg) आणि सिमरनजीत कौर (60Kg) यांना सेमीफायनल मध्ये सरळ प्रवेश मिळाला. मात्र यादरम्यान संघाचा सहाय्यक कर्मचारी कोरोना बाधित झाला असल्याचे आढळून आले. त्यानंतर संघातील सर्वांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. व नंतर कोणताही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आला नसल्याचे स्पष्ट झाले.    


​ ​

संबंधित बातम्या