बॉक्सिंग वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय बॉक्सर खेळाडूंचा डंका  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 20 December 2020

जर्मनीच्या कोलोन येथे झालेल्या बॉक्सिंग वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय बॉक्सर खेळाडूंनी दमदार कामगिरी करत इतिहास रचला आहे.

जर्मनीच्या कोलोन येथे झालेल्या बॉक्सिंग वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय बॉक्सर खेळाडूंनी दमदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत भारतीय बॉक्सर खेळाडूंनी शानदार कामगिरी करत तीन सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्यपदकांसह एकूण नऊ पदके जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारतीय महिला बॉक्सर सिमरनजीत कौरने 60 किलो वजनी गटात आणि मनीषने 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले. अंतिम सामन्यात महिला खेळाडू मनीषने भारतीय खेळाडू साक्षीचा 3-2 ने पराभव करत सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर सिमरनजीत कौरने जर्मनीच्या माया किल्हेन्सला 4-1 ने नमवले.  

सायलीनं स्वत:समोर ठेवलंय 2 सेकंदाच टार्गेट!
 
आशियायी स्पर्धेत चॅम्पियन ठरलेला आणि वर्ल्डचॅम्पियनशिप मध्ये रजत पदक मिळवलेल्या अमित पांघलला 52 किलो वजनी गटात शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात वॉकओव्हर मिळाला. त्यानंतर अनुभवी खेळाडू सतीशकुमारला 91 किलो वजनी गटात रजत पदकावर समाधान मानावे लागले. दुखापतीमुळे सतीशकुमारला प्रतिस्पर्धी खेळाडू विरोधात रिंग मध्ये उतरू शकला नव्हता.      

ला लिगा : लिओनेल मेस्सीची दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी  

याव्यतिरिक्त सोनिया लाठार (57 किलो), पूजा राणी (75 किलो), गौरव सोलंकी (57 किलो) आणि मोहम्मद हसमुद्दीन (57 किलो) यांनी आपापल्या वजनी गटात कांस्यपदक जिंकले. भारतीय बॉक्सर खेळाडूंनी मिळवलेल्या या धमाकेदार यशानंतर क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. 

 

 

  


​ ​

संबंधित बातम्या