फ्रान्समध्ये भारतीय बॉक्सरचा डंका  

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

तर 63 किलो वर्गातील शिव थापाला कास्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

फ्रान्सच्या नॅंट्स येथे होत असलेल्या अलेक्सिस वेस्टिन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय बॉक्सर कविंदरसिंग बिष्ट (57 किलो), अमित पांघल (52 किलो) आणि संजीत (91 किलो) यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर 63 किलो वर्गातील शिव थापाला कास्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. शिव थापाला उपांत्य फेरीच्या सामन्यात स्थानिक खेळाडू लोन्से हमोई याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. 

IPL 2020 : उर्मट वर्तवणुकीवरून विराट ट्रोल

आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळवलेल्या कविंदरने उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या बेनिक जॉर्ज मेलकुमनचा 3-0 असा पराभव केला. यानंतर  आता अंतिम सामन्यात त्याचा सामना स्थानिक बॉक्सर सॅम्युअल किस्तोहारी सोबत होणार आहे. याशिवाय इंडिया ओपन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या संजीत अमेरिकेच्या शेररोड फुलगमचा 2-1 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. यानंतर त्याचा सामना फ्रान्सच्या सोहेब बोफियाशी होईल.

IPL2020 : प्लेऑफची दावेदारी प्रबळ करण्याची पंजाबला संधी

याव्यतिरिक्त, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळवलेल्या अमित पांघलने अमेरिकेच्या ख्रिस्तोफर हेर्रेलाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मार्च महिन्यात जॉर्डनमध्ये ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा झाल्या होत्या. त्यानंतर भारतीय बॉक्सर पहिल्यांदाच बॉक्सिंग स्पर्धेत उतरले आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या