भारतीय बुद्धिबळ संघ आशियाई नेशन्स ऑनलाईन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत  

टीम ई-सकाळ
Saturday, 24 October 2020

अव्वल मानांकित भारतीय महिला बुद्धिबळ संघाने शुक्रवारी आशियाई नेशन्स (प्रादेशिक) ऑनलाईन बुद्धिबळ चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

अव्वल मानांकित भारतीय महिला बुद्धिबळ संघाने शुक्रवारी आशियाई नेशन्स (प्रादेशिक) ऑनलाईन बुद्धिबळ चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर पुरुष संघाने मंगोलियावर संघर्षपूर्ण विजय मिळवून अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. भारतीय महिला संघाने अंतिम आठ फेरीतील दोन्ही सामन्यांमध्ये किर्गिस्तानला 4-0 आणि 3.5-0.5 ने सहज पराभूत केले.त्यानंतर आता त्यांचा सामना आज मंगोलियाशी होणार आहे.

''विराट कोहली क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट मधील परिपूर्ण खेळाडू'...

भारतीय पुरुष संघाला मंगोलियाकडून कडवे आव्हान होते. मात्र दोन्ही सामन्यात भारतीय संघाने 2.5-1.5 च्या समान अंकाने विजय मिळवला. यानंतर आता त्यांचा सामना शनिवारी इराणशी होणार आहे. महिला ग्रँडमास्टर आर वैशालीने आपली चांगली कामगिरी कायम ठेवली असून, तिने दोन्ही सामन्यात विजय संपादन केला. तर पद्मिनी राऊत आणि पी व्ही नंदिता यांनीही आपापले दोन्ही सामने जिंकले. याव्यतिरिक्त भक्ती कुलकर्णी हिने  बेगमई जरबेकविरुद्धच्या सामन्यात फक्त अर्धा गुण गमावला. 

विश्‍वकरंडक विजेता कर्णधार कपिलवर अँजिओप्लास्टी

याअगोदरच्या सामन्यात देखील वैशालीने दमदार कामगिरी केली होती. तिने पहिल्या बोर्डावर 6.5 अंकांसह सुवर्णपदक मिळवले. याशिवाय कर्णधार मेरी एन गोम्सने पाचव्या बोर्डावर पाच सामने जिंकून सुवर्णपदक जिंकले होते. तर पद्मिनी राऊतने तिसर्‍या बोर्डावर नऊ सामन्यांत 7.5 गुणांसह रौप्यपदक मिळवले होते. त्यानंतर पुरुष संघातील के शशिकरणने दुसर्‍या बोर्डात नऊपैकी आठ गुणांसह रौप्यपदक जिंकले. पुरुषांच्या उपांत्य फेरीत निहालला सरीन गांजोरिग अमारातुश्विनकडून पराभव पत्करावा लागला. आणि एस पी सेतुरामन व शशिकरणने आपापल्या सामन्यात विजय मिळवला आहे. 


​ ​

संबंधित बातम्या