तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या राकेशने पटकावले सुवर्ण पदक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 March 2021

स्त्यावरील धंदा फारसा चालत नसल्याने त्याने आत्महत्येचा तीनदा प्रयत्न केला. 

नवी दिल्ली  :  पॅरा तिरंदाज राकेश कुमारने दुबईतील फॅझ्झा जागतिक मानांकन तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. आत्महत्येचा तीनदा प्रयत्न केलेल्या राकेशने तिरंदाजीने आपल्याला नवे जीवन दिले, असे सांगितले. जम्मूतील राकेशने 2017 पासून तिरंदाजीस सुरुवात केली. त्यापूर्वी तो रस्त्यावरती विविध गोष्टी विकत होता. त्याला अपघातामुळे पाय गमवावे लागले. व्हिलचेअरचाच आधार राहिला. रस्त्यावरील धंदा फारसा चालत नसल्याने त्याने आत्महत्येचा तीनदा प्रयत्न केला. 

ICC Test Rankings : रोहितची सर्वोत्तम रँकिंगला गवसणी; अश्विनलाही झाला फायदा

मी बेडवरच जास्त होतो. कुटुंबीयांना माझा वैद्यकीय खर्च परवडत नव्हता. त्यामुळे नैराश्‍यातून आत्महत्येचा प्रयत्न केला. याच सुमारास तिरंदाजीची ओळख करून देण्यात आली. मार्गदर्शकांनी मला नैराश्‍यातून बाहेर काढले. पॅराऑलिंपिकची पात्रता मिळवल्याने सरकारचे साह्य मिळत आहे. आता पैशाचा कोणताही प्रश्न नाही, असे त्याने सांगितले. राकेशने भारताच्याच शाम सुंदरला 143-135 हरवून सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी त्याने उपांत्य फेरीत तुर्कीच्या आग्यान याला तर उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल युक्रेनच्या ॲतामॅनेंक सेर्ही याला हरवले. 

हरविंदर, पूजाला सुवर्ण

हरविंदर आणि पूजाने रिकर्व्ह प्रकारातील मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. त्यांनी अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या तुर्कीच्या जोडीला टायब्रेकरमध्ये पराजित केले होते. शाम सुंदर आणि ज्योती बलियान यांनी कम्पाऊंडच्या मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकले. दोघांनी वैयक्तिक स्पर्धेतीलही रौप्य जिंकले.
 


​ ​

संबंधित बातम्या