आशियाई नेशन्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय महिला संघाचा डंका 

टीम ई-सकाळ
Sunday, 25 October 2020

भारतीय महिला संघाने आज आशियाई नेशन्स (प्रादेशिक) ऑनलाइन बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. तर पुरुष संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.   

भारतीय महिला संघाने आज आशियाई नेशन्स (प्रादेशिक) ऑनलाइन बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. भारतीय महिला संघाने अंतिम लढतीत इंडोनेशियाला  6-2 ने नमवत सुवर्णपदक जिंकले. तर पुरुष संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

पुरूष संघाला मात्र ऑस्ट्रेलियाकडून 3.5-4.5 पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने पहिला सामना 1.5-2.5 ने गमावला होता. मात्र त्यानंतर पुनरागमन करत त्यांनी दुसऱ्या सामन्यात 2-2 अशी बरोबरीत साधली होती. तर महिला गटातील अंतिम फेरीत पी व्ही नंदिताने चेल्सी मोनिका इग्नाटियस सिहेतीचा पराभव करत,  भारतीय संघाला पहिला अंक मिळवून दिला. यानंतर पूनम राऊतने मदिना वार्द इल्याचा पराभव केला. आणि आर वैशाली व कर्णधार मेरी एन गोम्स आपापले सामने बरोबरीत सोडवले. यामुळे भारतीय संघाने पहिला सामना 3-1 ने जिंकला.

CSK विरोधात विराटसेना ग्रीन जर्सीत का ? कारण वाचून तुम्हीही कराल सलाम 

त्यानंतर दुसर्‍या सामन्यात वैशालीला आयरीन करिश्मा सुकंदरकडून पराभव पत्करावा लागला. परंतु भक्ती कुलकर्णी, पद्मिनी राऊत आणि नंदिता यांनी आपापल्या लढतीत विजय मिळवला. भारतीय महिला संघाने प्राथमिक टप्प्यात देखील पहिले स्थान गाठले होते. वैशालीने नऊ सामन्यात 6.5 मिळवत सुवर्णपदक मिळवले.

त्यानंतर पुरुषांच्या अंतिम सामन्यातील पहिल्या फेरीत बी अ‍ॅडीबन व एसपी सेतुरामन यांना अँटोन स्मिर्नोव व मॅक्स इलिंगवर्थ यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. तर दुसऱ्या सामन्यात एसपी सेतुरामन यांच्या जागी सूर्य शेखर गांगुली खेळला आणि त्याने इलिंगवर्थला पराभूत केले. मात्र कुयबोकारोव्हने सरीनचा पराभव करून बरोबरी साधली. आणि अ‍ॅडीबन व शशीकरण यांच्यातील सामना अनिर्णित राहिला.  
 


​ ​

संबंधित बातम्या