भारतीय कुस्तीगीरांची मोहीम आजपासून

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 August 2021

यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताला पदकांच्या सर्वाधिक आशा नेमबाजी आणि कुस्ती या खेळांत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एकापेक्षा एक सरस स्पर्धक असतानाही भारतीय नेमबाज पदकांपासून वंचित राहिले. आता उद्यापासून भारतीयांची कुस्तीतील मोहीम सुरू होत आहे.

टोकियो - यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताला पदकांच्या सर्वाधिक आशा नेमबाजी आणि कुस्ती या खेळांत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एकापेक्षा एक सरस स्पर्धक असतानाही भारतीय नेमबाज पदकांपासून वंचित राहिले. आता उद्यापासून भारतीयांची कुस्तीतील मोहीम सुरू होत आहे. सलामीलाच हरहुन्नरी सोनम मलिकचा सामना होणार आहे.

ऑलिंपिकमधील कुस्ती स्पर्धांना दोन दिवसांपासून सुरुवात झालेली आहे, परंतु भारतीय सहभागी होत असलेले गट उद्यापासून सुरू होत आहेत. भारताचे एकूण सात मल्ल स्पर्धेत आहेत. त्यात बजरंग पुनिया आणि विनेश फोघट यांच्याकडून पदकांच्या सर्वाधिक आशा आहेत.

उद्या ६२ किलो गटात १९ वर्षीय सोनम मलिकचा समावेश असून तिचा सामना मंगोलियाच्या बोलोर्तुया खुरेलखुऊ हिच्याशी होणार आहे. बोलोर्तुया ही आशिया रौप्यपदक विजेती आहे. एप्रिल महिन्यात अलमाटी येथे झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेत अंतिम फेरी गाठून सोनमने ऑलिंपिकचे आपले तिकीट पक्के केले होते.

दुखावलेल्या गुडघ्यावर उपचार करून सोनम टोकियोत दाखल झाली. या दुखापतीमुळे ती रशियात झालेल्या सरावात सहभागी झाली नव्हती. सोनमसह पात्र ठरलेली १९ वर्षीय अंशू मलिक कशी लढत देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ऑलिंपिकमध्ये खेळणारे भारतीय मल्ल
सोनम मलिक (महिला फ्रीस्टाईल ६२ किलो)
सीमा बिसला (महिला फ्रीस्टाईल ५० किलो)
विनेश फोगट (महिला फ्रीस्टाईल ५३ किलो)
अंशू मलिक (महिला फ्रीस्टाईल ५७ किलो)
रवी कुमार दहिया (पुरुष फ्रीस्टाईल ५७ किलो)
बजरंग पुनिया (पुरुष फ्रीस्टाईल ६५ किलो)
दीपक पुनिया (पुरुष फ्रीस्टाईल ८६ किलो)


​ ​

संबंधित बातम्या