ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे १९० सदस्यांचे पथक; नरिंदर बत्रा यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 June 2021

भारताचे शंभर खेळाडू आत्तापर्यंत ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. अजून २५ ते ३५ खेळाडू पात्र ठरण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे १९० सदस्यांचे पथक जाण्याची शक्यता भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी वर्तवली.

नवी दिल्ली - भारताचे शंभर खेळाडू आत्तापर्यंत ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. अजून २५ ते ३५ खेळाडू पात्र ठरण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे १९० सदस्यांचे पथक जाण्याची शक्यता भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी वर्तवली.

ऑलिंपिकसाठी आत्तापर्यंत ५६ पुरुष आणि ४४ महिला असे १०० खेळाडू पात्र ठरले आहेत. त्यात नक्की २५ ते ३५ ने वाढ होईल. अजून तीन आठवड्यांची ऑलिंपिक प्रक्रिया शिल्लक आहे. पदाधिकारी तसेच सपोर्ट स्टाफ लक्षात घेतल्यास एकंदर संख्या १९० पर्यंत जाईल, असे बत्रा यांनी सांगितले. भारत या स्पर्धेत दहा पदके जिंकेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

स्पर्धा              खेळाडू       खेळ    पदके
रिओ २०१६         ११७        १५        २
लंडन २०१२         ८३         १३        ६
बीजिंग २००८       ५७         १२         ३
(बीजिंग ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे हॉकी संघ पात्र ठरले नव्हते, तर रिओत ३२ हॉकीपटू वाढले.)  

पंतप्रधानांकडून पूर्वतयारीचा आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिंपिक पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यांनी ऑलिंपिकला जाणाऱ्या प्रत्येकाचे लसीकरण करण्याची सूचना केली, त्याचबरोबर सरावासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही दिली. ऑलिंपिक पथकासह आपण जुलैत संवाद साधणार असल्याचेही पंतप्रधनांनी सांगितले. स्पर्धा कालावधीत खेळाडूंचे मनोधैर्य उच्च राहण्यासाठी त्यांच्या पालकांबरोबरही संवाद साधण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले.

ऑलिंपिकमध्ये भारतीय परिधान करणार असलेल्या किटचे अनावरण क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी केले.


​ ​

संबंधित बातम्या