राहुलचा 'बाहुबली' शो; महाकाय अमेरिकन बिल्डरला दाखवली जागा (Viral Video)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 12 January 2021

दोघांच्या लढतीचा क्षण लॅरीच्या व्हिडिओग्राफर  एडम सिल्वरने कॅमेऱ्यात कैद केला होता. आता तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून राहुलचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

कोच्ची (Kochi) चा मूळ रहिवासी असलेला भारतीय बिल्डर राहुल पॅनिकरने (Rahul Panicker) प्रसिद्ध बॉडीबिल्डर लॅरी व्हील्स (Larry Wheels) विरुद्ध  पंजा लढवल्याचे पाहायला मिळाले. या लढतीत त्याने महाकाय अमेरिकन बिल्डरला पराभूत करुन भारतीयांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी करुन दाखवली आहे. सोशल मीडियावर या लढतीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय.  

राहुल पॅनिकर एक आर्म रेसलर आहे. अमेरिकन बिल्डरविरुद्ध पंजा लढवण्याच्या शर्यतीत सुरुवातीला राहुल पिछाडीवर होता. मात्र अखेरच्या क्षणी त्याने डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर प्रतिस्पर्ध्याला जागा दाखवून देत आपल्या बाहूतील ताकद दाखवून दिली. ही लढत 5 फेरीत खेळवण्यात आली होती.

लॅरी व्हिल्स प्रसिद्ध बिल्डर असल्यामुळे राहुलचा त्याच्यासमोर निभाव लागेल का? असा प्रश्न दोघांना पाहून अनेकांना पडला होता. पण  हारी बाजी जितना हमे आता है... या तोऱ्यात राहुलने लढत जिंकली. सुरुवातीच्या दोन राउंडमध्ये लॅरीने सहज बाजी मारली. उर्वरित राउंड जिंकत राहुलने 'हम किसी से कम नही!' शो दाखवून दिला.  

पुजारा, पंत आणि अश्विनच्या टीकाकारांना दादाचं प्रत्युत्तर; काय म्हणाला पाहा   

इंडियन आर्म रेसलिंग फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार, दुबईत रंगलेली  ही लढत जिंकणे खूप कठिण काम होते. दोघांच्या लढतीचा क्षण लॅरीच्या व्हिडिओग्राफर  एडम सिल्वरने कॅमेऱ्यात कैद केला होता. आता तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून राहुलचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर प्रतिक्रिया नोंदवत अनेक नेटकरी राहुलच्या कामगिरीला दाद देताना पाहायला मिळत आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या