भारतीयांच्या टोकियो प्रवासाची माहिती द्या; आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची विचारणा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 May 2021

ऑलिंपिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय क्रीडापटू तसेच पदाधिकाऱ्यांच्या प्रवासाची विस्तृत माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने भारताकडून मागवली आहे.

मुंबई - ऑलिंपिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय क्रीडापटू तसेच पदाधिकाऱ्यांच्या प्रवासाची विस्तृत माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने भारताकडून मागवली आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेने संलग्न राष्ट्रीय क्रीडा महासंघांना याबाबत माहिती देण्याची सूचना केली आहे.

भारताचे आतापर्यंत जवळपास १०० खेळाडू ऑलिंपिकसाठी पात्र ठरले आहेत. या खेळाडूंच्या संघटनांना भारतीय ऑलिंपिक संघटनेने आठ प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले आहे. त्यात खेळाडू तसेच पदाधिकाऱ्यांच्या लसीकरणाची माहिती देण्यास सांगितले आहे. त्यात किती डोस घेतले, कोणता डोस घेतला. कधी घेतले, याची माहिती देण्यास सांगितले आहे.

राष्ट्रीय क्रीडा महासंघांना ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या खेळाडूंच्या प्रवासाची विस्तृत माहिती देण्यासही सांगितले आहे. त्यात पात्र खेळाडूंना नियमावलीबाबत सूचना दिली आहे का, अतिरिक्त कोणती काळजी घेतली आहे हेही विचारले आहे.

लसीकरण आकडेवारीत

  • ऑलिंपिकमध्ये खेळण्याची संधी असलेल्या १४८ खेळाडूंना लस
  • लसीच्या दोन्ही मात्रा १७ खेळाडूंना
  • १३१ खेळाडूंना केवळ पहिलीच मात्रा
  • २३ क्रीडा पदाधिकाऱ्यांना लसीच्या दोन्ही मात्रा
  • ८७ पदाधिकाऱ्यांना पहिला डोस
  • पॅराऑलिंपिकमधील १३ खेळाडूंचा पहिला डोस
  • दोन पॅराऑलिंपिकपटूंचे दोन्ही डोस झाले

​ ​

संबंधित बातम्या