आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसची 238 दिवसांनंतर सर्व्हिस

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

चीनच्या पूर्व किनाऱ्यावरील वेईहाई येथे होत असलेल्या या तीन दिवसांच्या स्पर्धेत २१ खेळाडूंचा सहभाग आहे. या स्पर्धेपाठोपाठ दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धाही चीनमध्ये होणार आहेत. या स्पर्धेस क्रीडाजगतात आगळेच महत्त्व आहे. चीनमधून कोरोनाची साथ सुरू झाली आणि त्याचा जगातील सर्वच क्रीडा स्पर्धांना फटका बसला. चीनने जुलैत देशात या वर्षात कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार नाही, असे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर सलग तीन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा चीनमध्ये होत आहेत. 

शांघाय : आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेचे अखेर पुनरागमन झाले आहे. सक्तीच्या आठ महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होत आहेत. महिला विश्वकरंडक स्पर्धा प्रेक्षकांविना सुरू झाली आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेचा २३८ दिवसांचा दुष्काळ संपला.

चीनच्या पूर्व किनाऱ्यावरील वेईहाई येथे होत असलेल्या या तीन दिवसांच्या स्पर्धेत २१ खेळाडूंचा सहभाग आहे. या स्पर्धेपाठोपाठ दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धाही चीनमध्ये होणार आहेत. या स्पर्धेस क्रीडाजगतात आगळेच महत्त्व आहे. चीनमधून कोरोनाची साथ सुरू झाली आणि त्याचा जगातील सर्वच क्रीडा स्पर्धांना फटका बसला. चीनने जुलैत देशात या वर्षात कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार नाही, असे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर सलग तीन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा चीनमध्ये होत आहेत. 

विराटची रजा मंजूर; टीम इंडियाला 3 कसोटी सामने त्याच्याशिवाय खेळावे लागणार

एका वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेल्या टोकियो ऑलिंपिकच्या पूर्वतयारीसाठी ही स्पर्धा सर्वांसाठीच महत्त्वाची आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतून मिळणारे मानांकन गुणही मोलाचे ठरतील. आता कित्येक महिने स्पर्धा नाही, सराव नाही, यामुळे सर्व्हिस चुकली तरी आश्‍चर्य नको, अशी टिप्पणी स्पर्धेपूर्वी खेळाडू करीत होते. या स्पर्धेत सुरुवातीच्या फेरीत पराजित झालेले खेळाडूही फारसे निराश नव्हते. 

​ ​

संबंधित बातम्या