आंतरराष्ट्रीय वॉटरपोलोपटू अभय दाढे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

माजी आंतरराष्ट्रीय वॉटरपोलोपटू आणि जलतरण संघटक अभय सुमंत दाढे यांचे निधन झाले.

पुणे : माजी आंतरराष्ट्रीय वॉटरपोलोपटू आणि जलतरण संघटक अभय सुमंत दाढे (वय 55) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

दाढे यांनी 1980 ते 90 या दशकात अनेक वॉटरपोलो स्पर्धा गाजवल्या. आशियाई स्पर्धेत ब्राँझपदकही जिंकले होते. अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत पुणे विद्यापीठाच्या वॉटरपोलो संघाचेही नेतृत्व केले होते. त्यांना 1995 मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र आणि रेल्वेकडून खेळताना त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली.

चॅम्पियन्स फुटबॉल लीग : किंग्जलेच्या दोन गोलमुळे बायर्नचा अ‍ॅटलिटिको माद्रिदवर...

जलतरण संघटक म्हणूनही दाढे यांनी काम पाहिले. त्यांनी पुणे जिल्हा हौशी संघटनेसह राज्य संघटनेचे अध्यक्षपद, भारतीय संघटनेचे उपाध्यक्षपद, भारतीय महासंघाच्या वॉटरपोलो उपसमितीचे अध्यक्षपदही भूषविले. शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचेही ते माजी अध्यक्ष होते. राज्यातील जलतरणात झालेल्या सकारात्मक बदलात त्याचा मोठा वाटा होता. 


​ ​

संबंधित बातम्या