ISSF WC: अंतर्गत वादामुळे हंगेरी आऊट; भारत-अमेरिका यांच्यात फायनल

टीम सकाळ स्पोर्ट्स
Thursday, 25 March 2021

सुवर्ण पदकासाठी आता शुक्रवारी भारतीय पुरुष संघ तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकन विरुद्ध गोल्डन कामगिरी साकारण्यासाठी सज्ज असेल. 

दिल्ली येथे सुरु असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतून अंतर्गत वादामुळे हंगेरी संघाचे सुवर्ण कामगिरीचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. हंगेरीचा स्टार नेमबाज पीटर सिडीसंदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संघाला पुरुष गटातील 50 मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे भारत आणि हेंगरी यांच्यातील गुरुवारची फायनल स्थगित करण्यात आली. सुवर्ण पदकासाठी आता शुक्रवारी भारतीय पुरुष संघ तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकन विरुद्ध गोल्डन कामगिरी साकारण्यासाठी सज्ज असेल. 

बुधवारच्या पात्रता फेरीनंतर भारत आणि हंगेरी अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर होते. या दोन्ही संघात फायनलची रंगत होणार होती. पण  हंगेरी संघाचा नेमबाज इस्तवान पेनी  आणि जावान पेकलर यांनी पीटर सिडीसोबत खेळण्यास नकार दिला. 42 वर्षीय सिडी पाचवेळचा ऑलिम्पियन आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन राहिला आहे.  त्याने 2010 मध्ये म्यूनिख वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार 'हंगेरीच्या टीमने सिडीसोबत बंडखोरी केली आहे. हंगेरीच्या संघातील अंतर्गत वाद गेल्या चार-पाच वर्षांपासून धुमसत असल्याचेही बोलले जात आहे. मागील वर्षी राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्येही हा वाद चव्हाट्यावर आला होता.  

...म्हणून कृणाल पांड्या ड्रेसिंग रुममध्ये घेऊन आला होता वडिलांची कपडे

भारतीय संघाकडून नीरज कुमार, स्वप्निल कुसाले आणि चैन सिंह यांनी  875 गुणांसह फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे.  हंगेरीचा पेनी, पेकलर आणि सिडी दुसऱ्या स्थानावर होते. या त्रिकूटाने स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता अमेरिकन निकोलस मोवरर, टिमोथी शेरी आणि पॅट्रिक सुंदरमन या तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंकडे सुवर्ण संधी चालून आली आहे. भारत भारत भारत 
 


​ ​

संबंधित बातम्या