ISSF World Cup : भारताची सुवर्ण दशकपूर्ती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 March 2021

राही, चिंकी आणि मनू 25 मीटर सांघिक पिस्तूलमध्ये अव्वल
 

मुंबई : राही सरनोबत, चिंकी यादव आणि मनू भाकरने विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेतील भारताचा सुवर्णधडाका कायम ठेवला. त्यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने २५ मीटर पिस्तूलच्या महिला सांघिक स्पर्धेत बाजी मारत सुवर्णपदकांची दशकपूर्ती केली.
राही, मनू आणि चिंकीने पोलंड कोणतेही आव्हान निर्माण करणार नाही याची खबरदारी घेत भारतास १७-७ असा विजय मिळवून दिला. आशियाई क्रीडा विजेत्या राहीने त्यात मोलाची कामगिरी बजावताना तिने पाच शॉटस्‌च्या पाचही फेऱ्यांत अचूकता साधली. प्रत्येक जिंकलेल्या फैरीसाठी दोन गुण देण्यात येतात.

50 मीटर रायफलच्या थ्री पोझिशन स्पर्धेत भारतीय संघास रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. नीलिंग, प्रोन आणि स्टॅंडिंग या तीन प्रकारांत एकही भारतीय महिला वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीस पात्र ठरली नव्हती. 

IPL च्या तयारीसाठी धोनीच्या CSK ची मुंबईला पसंती; जाणून घ्या प्लॅन

अंतर्गत संघर्षामुळे हंगेरीची माघार

भारतीय पुरुष संघ 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार होता, पण संघातील स्टार नेमबाज पीटर सिदी याच्यासह अन्य सहकाऱ्यांचा वाद झाल्याने हंगेरीने अंतिम लढतीतून माघार घेतली. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यात उद्या सुवर्णपदकासाठी लढत होईल. भारत आणि हंगेरी यांच्यातील अंतिम लढत सकाळी ११ वाजता होणार होती, पण हंगेरी संघातील इत्सावान पेनी आणि झॅवान पेकियर यांनी आपण सिडीसह खेळणार नसल्याचे तांत्रिक आधिकाऱ्यांना सांगितले.
सिडी वापरत असलेले साहित्य नियमास धरून नाही असे त्यांनी तांत्रिक समितीस सांगितल्याचे समजते; मात्र तांत्रिक समितीने त्यास यापूर्वीच मान्यता दिली होती. पात्रतेच्या दुसऱ्या टप्प्यानंतर नीरज कुमार, स्वप्नील कुसळे आणि चैन सिंग यांचा समावेश असलेला भारतीय संघ ८७५ गुणांसह पहिला होता.

पदक क्रमवारी

देश     सुवर्ण     रौप्य     ब्राँझ
भारत     10 6 5
अमेरिका     3 2 1
डेन्मार्क     2 - 1
पोलंड     1 2 2
कझाकस्तान     1 2 1

C

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेपूर्वीची प्रत्येक स्पर्धा महत्त्वाची आहे. आता कोणताही ब्रेक नसेल. या स्पर्धेतून खूप काही शिकलो आहोत. दीर्घ कालावधीतून स्पर्धेत नेमबाजी केली आहे. सरावात सगळेच चांगले होत असते, पण प्रत्यक्ष स्पर्धेत नेमके काय चुकते ते कळते. त्यामुळे कमकुवत बाबींवर मात करण्यासाठी पूर्वतयारी करणार 
- राही सरनोबत.
 


​ ​

संबंधित बातम्या