ISSF World Cup : विजयवीर सिद्धू- तेजस्विनीची रॅपिड फायरमध्ये गोल्डन कामगिरी

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 27 March 2021

सुवर्णपदकासाठी फायनलमध्ये दोन्ही टीम भारताच्या होत्या. त्यामुळे भारताला गोल्ड मिळणार हे निश्चित होते.

दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शूटिंग वर्ल्डकपमध्ये भारतीय नेमबाजांचा बोलबाला सुरुच आहे. 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिक्स टी प्रकारात भारताला आणखी एक गोल्ड मिळाले आहे. भारताचा नेमबाज विजयवीर सिद्धू आणि तेजस्विनी या जोडीने शनिवारी सुवर्ण कामगिरीची नोंद केली. सुवर्णपदकासाठी फायनलमध्ये दोन्ही टीम भारताच्या होत्या. त्यामुळे भारताला गोल्ड मिळणार हे निश्चित होते.

INDvsENG : वनडे दरम्यान पुण्याच्या टेकडीवर रंगला होता सट्टेबाजीचा खेळ 

विजयवीर आणि तेजस्विनी या जोडीने आपल्याच देशाच्या गुरप्रीत सिंह आणि अभिदन्या अशोक पाटील या जोडीला 9-1 असे पराभूत केले. पात्रता फेरीत गुरप्रीत आणि अभिन्या जोडी 370 गुणांसह टॉपला होती. तर  16 वर्षीय तेजस्वीनी आणि 18 वर्षीय विजयवीर ही जोडी  368 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिली होती.  

INDvsENG : थर्ड अंपायरने स्टोक्सला दिले नॉट आउट, कोहली झाला नाराज​

शुक्रवारी विजयवीरने  अनीश भानवाला आणि गुरप्रीत या भारतीय नेमबाजांना मागे टाकून 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात व्यक्तिगत रौप्य पदक पटकावले होते. वर्ल्ड कप स्पर्धेतील पदतालिकेत  13 गोल्डसह भारत अव्वलस्थानी आहे. भारताने यास्पर्धेत 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकासह एकूण 27 पदक मिळवली आहेत.  
 


​ ​

संबंधित बातम्या