झिलची अविश्वसनीय कामगिरी; 26 वर्षानंतर भारताला मिळवून दिले गोल्ड

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 19 April 2021

सुवर्ण कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय महिला ठरली आहे. या दोघींनी 1995 मध्ये सुवर्ण कामगिरी केली होती. 26 वर्षानंतर झिलीने असा पराक्रम करुन दाखवलाय.   

ताश्कंद येथे सुरू असलेल्या आशिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या झिली डालबेहडा हिने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. 45 किलो वजनी गटात तिने गोल्ड मेडल मिळवले. ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक मिळवलेल्या झिलीने स्नॅचमध्ये 69 किलो ग्रॅम, क्लीन आणि जर्कमध्ये 88 किलो वजन उचलले. ऑलिम्पिक क्वालिफाय स्पर्धेत तिने एकूण 157 किलो वजन उचलत तिन्ही प्रकारात आघाडीवर राहिली.  या स्पर्धेत फिलिपिन्सच्या मेरी फ्लेर डायज हिने 135 किग्रॅ (60 आणि 75 किग्रॅ) वजनासह रौप्य पदक पटकावले. या विजयासह तिने मागील वर्षीच्या कामगिरीत सुधारणा केलीय. यापूर्वी तिने 2019 च्या स्पर्धेत 162 किग्रॅ (71 किग्रॅ आणि 91 किग्रॅ) वजनासह रौप्य पदक पटकावले होते. आशियाई स्पर्धेत  कुंजाराणी देवी आणि कर्णम मल्लेश्वरी यांच्यानंतर सुवर्ण कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय महिला ठरली आहे. या दोघींनी 1995 मध्ये सुवर्ण कामगिरी केली होती. 26 वर्षानंतर झिलीने असा पराक्रम करुन दाखवलाय.   

तिच्याशिवाय स्नेहा सोरेन महिलांच्या 55 किग्रॅ वजनी गटातील बी ग्रुपमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिली. ओडिसाच्या 20 वर्षीय वेटलिफ्टरने 164 किग्रॅ (71 किग्रॅ आणि 93 किग्रॅ) वजन उचलले. या गटात चार महिला स्पर्धकांचा सहभाग होता. स्नेहाने 68 किग्रॅ आणि 71 किग्रॅ  वजन उचलल्यानंतर अखेरच्या टप्प्यातील स्नॅचमध्ये  73 किग्रॅ  वजन उचलण्यात अपयश आले.  क्लीन आणि जर्कमध्ये तिने 93 किग्रॅ वजन सहज उचलले. पण त्यानंतर 98 आणि 100 किग्रॅ वनज उचलण्यात तिला अपयश आले.  

IPL 2021 : रसेलनं जाणूनबुजून धावबाद नाही केलं? पाहा Video

वेटलिफ्टर मीराबाईची विश्वविक्रमी कामगिरी पण...

आशिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूने 49 किलो क्लीन आणि जर्क विभागात 119 किलो वजन उचलून जागतिक विक्रम केला, परंतु तिला ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले. तिने या स्पर्धेत वैयक्तिक 205 किलोचा (86 +119) उच्चांकही केला. वर्षानंतर तिची ही पहिली स्पर्धा आहे.
ऑलिंपिकसाठी पात्रता मिळवण्याची संधी असलेल्या मीराबाईची याअगोदरची सर्वोत्तम कामगिरी 203 किलोची होती. ही तिने कोलकाता येथे गतवर्षी फेब्रुवारीत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत केली होती. ताश्कंद येथील आशिया स्पर्धेत तिची सुरुवात अडखळती होती. तिसऱ्या प्रयत्नात तिने ८६ किलोचे वजन उचलले. क्लीन आणि जर्कमध्ये तिने 113 आणि 197 किलोचे वजन पहिल्या दोन प्रयत्नांत उचलले. तिसऱ्या प्रयत्नात 119 किलो वजन उचलून विक्रम केला.
 


​ ​

संबंधित बातम्या