टोकियोची पात्रता गाठण्याची भारतीयांना शेवटची संधी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 June 2021

कोरोनाचे सावट कायम असले तरी टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची शेवटची संधी असल्याने अनेक दावेदार खेळाडू उद्या, शुक्रवारपासून पतियाळा येथे सुरू होत असलेल्या सीनियर आंतर राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होत आहे.

नागपूर - कोरोनाचे सावट कायम असले तरी टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची शेवटची संधी असल्याने अनेक दावेदार खेळाडू उद्या, शुक्रवारपासून पतियाळा येथे सुरू होत असलेल्या सीनियर आंतर राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होत आहे. त्यात प्रामुख्याने हिमा दास, द्युतीचंदचा समावेश आहे.

स्पर्धेला जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने ‘ब'' दर्जा दिला आहे. त्यामुळे या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा खेळाडूंचा प्रयत्न राहील.


​ ​

संबंधित बातम्या