हॅमिल्टन फॉर्म्युला वन मालिकेत सातव्यांदा विजेता; शूमाकरला गाठले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

या विजेतेपदापूर्वीच त्याचे सर्वांगीण विजेतेपद निश्‍चित होते. त्याने तुर्की शर्यत जिंकत त्यावर शिक्कामोर्तब केले. त्याचबरोबर सर्वाधिक सात वेळा सर्वांगीण विजेतेपद जिंकण्याच्या मायकेल शूमाकरच्या विक्रमाशी बरोबरी साधली. हॅमिल्टन यापूर्वीच सर्वाधिक शर्यती, पात्रता फेरीतील अव्वल क्रमांक तसेच पदक मंचावरील स्थान यात सर्वाधिक यश मिळवले आहे.

इस्तंबूल :  लुईस हॅमिल्टनने विक्रमी सातव्यांदा फॉर्म्युला वन मालिकेतील सर्वांगीण विजेतेपद जिंकले. त्याने मोसमाची सांगता करणाऱ्या तुर्कीश ग्राप्रि शर्यतीत अव्वल क्रमांक मिळवला. निसरड्या ट्रॅकवरही हॅमिल्टनने सहज हुकूमत राखली.

या विजेतेपदापूर्वीच त्याचे सर्वांगीण विजेतेपद निश्‍चित होते. त्याने तुर्की शर्यत जिंकत त्यावर शिक्कामोर्तब केले. त्याचबरोबर सर्वाधिक सात वेळा सर्वांगीण विजेतेपद जिंकण्याच्या मायकेल शूमाकरच्या विक्रमाशी बरोबरी साधली. हॅमिल्टन यापूर्वीच सर्वाधिक शर्यती, पात्रता फेरीतील अव्वल क्रमांक तसेच पदक मंचावरील स्थान यात सर्वाधिक यश मिळवले आहे.

तुर्की शर्यतीत मर्सिडीस संघातील हॅमिल्टन अव्वल येत असताना फेरारी संघातील सेबॅस्टियन व्हेटेल तिसरा आला. सर्जिओ पेरेझने दुसरा क्रमांक मिळवला. हॅमिल्टनचे हे  94  वे विजेतेपद होते. पात्रतेत सहावा असतानाही हॅमिल्टनने प्रभावी कामगिरी करीत शर्यत जिंकली. हॅमिल्टनच्या चमकदार कामगिरीमुळे त्याच्या मर्सिडीस संघाचे सांघिक विजेतेपदही निश्‍चित झाले.  

​ ​

संबंधित बातम्या