लुईस हॅमिल्टनने पोर्तुगाल ग्रांप्री जिंकत मायकेल शुमाकरला टाकले मागे   

टीम ई-सकाळ
Monday, 26 October 2020

ब्रिटीश फॉर्म्युला वन ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनने रविवारी पोर्तुगाल ग्रांप्री जिंकली.

ब्रिटीश फॉर्म्युला वन ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनने रविवारी पोर्तुगाल ग्रांप्री जिंकली. पोर्तुगाल ग्रांप्री जिंकून त्याने एफ-वन रेस मध्ये इतिहास रचला आहे. लुई हॅमिल्टनने त्याच्या कारकीर्दीतील 92 वा विजय मिळवत, प्रख्यात जर्मन ड्रायव्हर मायकेल शुमाकरला मागे टाकले आहे. हॅमिल्टन त्याचा सहकारी मर्सिडीज ड्रायव्हर वोल्टेरी बोटासपेक्षा 25.6 सेकंद पुढे होता. त्यानंतर रेड बुलचा मॅक्स वॉर्साटाप्पेन या शर्यतीत तिसऱ्या स्थानी आला.    

#BlackLivesMatter - मुंबईच्या पराभवनंतर पांड्याने केलेल्या ट्विटची चर्चा

पोर्तुगाल ग्रांप्रीत हॅमिल्टनने सर्वात वेगवान लॅप पूर्ण केली. आणि त्यासोबतच अतिरिक्त गुण देखील मिळवला. व चॅम्पियनशिप टेबलमध्ये त्याने बोटास 77 गुणांची आघाडी घेतली आहे. 2013 मध्ये हॅमिल्टन मर्सिडीजमध्ये दाखल झाला होता. 2007 मध्ये त्याने पहिली एफ-वन रेस जिंकली होती. आणि 2008 मध्ये पहिले विजेतेपद जिंकले होते. त्याने आतापर्यंत पाच एफ-वन विजेतेपद जिंकले आहेत. तर मायकेल शुमाकरच्या नावावर सात विजय आहेत.

लुईस हॅमिल्टनने 2007 मध्ये मॅकलरेनबरोबर पदार्पण केल्यापासून, प्रत्येक हंगामात कमीतकमी एक तरी शर्यत जिंकली आहे. आणि  2014 मध्ये व्ही 6 टर्बो हायब्रीड काळ सुरू झाल्यापासून त्याच्या विजयाची सरासरी 10 झाली आहे. 10 जून 2007 रोजी कॅनडाच्या मॉन्ट्रियल येथील सर्किट गिलेस व्हिलन्यूव्ह येथे त्याने पहिला विजय नोंदविला होता. त्यानंतर येथे त्याने सात विजय मिळवले आहेत. तर मायकेल शुमाकरने एकाच ग्रांप्री मध्ये सर्वाधिक आठ वेळा विजय मिळवलेला आहे.    

 

 


​ ​

संबंधित बातम्या