रोमाग्ना ग्रांप्री शर्यतीत लुईस हॅमिल्टनचा विजय  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 November 2020

लुईस हॅमिल्टनने या शर्यतीत ग्रीड पासून दुसऱ्या क्रमांकावर सुरवात केल्यानंतर मर्सिडीजचाच सहकारी वोल्टेरी बोटासला 5.7 सेकंदाने मागे टाकले.

एमिलीया रोमाग्ना ग्रांप्रीत लुईस  हॅमिल्टनने विजय मिळवला आहे. रविवारी झालेल्या रोमाग्ना ग्रांप्री शर्यत जिंकण्यासोबतच लुईस  हॅमिल्टनने फॉर्म्युला वनमध्ये 93  विजय मिळवण्याचा विक्रम केला आहे. लुईस  हॅमिल्टनने या शर्यतीत ग्रीड पासून दुसऱ्या क्रमांकावर सुरवात केल्यानंतर मर्सिडीजचाच सहकारी वोल्टेरी बोटासला 5.7 सेकंदाने मागे टाकले. लुईस हॅमिल्टन सोबतच मर्सिडीजने पुन्हा एकदा सांघिक जेतेपद मिळवले आहे. 

IPL 2020 : शाहरुख खानने 367 कोटींना खरेदी केला होता KKR चा संघ; आता किती आहे...

लुईस  हॅमिल्टन आणि वोल्टेरी बोटास नंतर रेनॉल्ट ड्रायव्हर डॅनियल रिकार्डोने तिसरा क्रमांक पटकाविला. 2006 नंतर प्रथमच इमोला येथे फॉर्म्युला वन शर्यत आयोजित करण्यात येत आहे. 2006 मध्ये जर्मनीचा ड्रायव्हर मायकल शूमाकरने विजय मिळवला होता. हॅमिल्टनने मागील आठवड्यातच शुमाकरच्या 91 फॉर्म्युला वनच्या विजयाचा विक्रम मोडला होता. 

लॉकडाउननंतरही ब्रिटन, जर्मनीत फुटबॉल लीग सुरूच

दरम्यान,  पोर्तुगाल ग्रांप्री जिंकून लुईस  हॅमिल्टनने एफ-वन रेस मध्ये इतिहास रचला होता. लुई हॅमिल्टनने त्याच्या कारकीर्दीतील 92 वा विजय मिळवत, प्रख्यात जर्मन ड्रायव्हर मायकेल शुमाकरला मागे टाकले होते.        


​ ​

संबंधित बातम्या