महाराष्ट्र केसरीसाठी पैलवान शड्डू ठोकणार; प्रेक्षकांशिवाय रंगणार स्पर्धा

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 8 January 2021

राज्य सरकारने कोरोना संबधीत जारी केलेले आदेश आणि नियमांचे पालन करुन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाही पार पडेल.

Maharashtra Kesari wrestling tournament  : कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरुन अनेक खेळ हळूहळू सुरु होत असताना आता महाराष्ट्र केसरीचा आघाडारी रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने स्पर्धा भरवण्याची परवानगी दिली आहे.राज्य सरकारने प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा भरवण्यास परवानगी दिल्याचे समजते. फेब्रुवारी अखेरीस ही स्पर्धा पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात पार पडण्याची शक्यता आहे.

हिंदकेसरी आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सदस्य पै. योगेश दोडके यांनी यासंदर्भातील माहिती दिली असून लवकरच यासाठी निवड चाचणीला सुरुवात होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्रीडा क्षेत्राला फटका बसला होता. महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील मल्लांचा शड्डूचा आवाजही बंद झाला होता. 

बापामुळं लेक हारली! विजेती 30 वर्षीय चॅम्पियन म्हणते; मी तुझी सावत्र आई

महाराष्ट्र केसरी या मानाच्या स्पर्धेचा मार्ग मोकळा झाल्यामुळे आता मल्लांचा शड्डू पुन्हा घुमणार आहे. स्पर्धा होणार त्यामुळे पैलवानांसाठी आनंदाची बाब असली तरी कोरोनाच्या निमावलीचे पालन करत ही स्पर्धा पार पाडण्याचा प्रयत्न आयोजकाकडून करण्यात येईल. त्यामुळे कुस्ती शौकीनांचा हिरमोड झाला आहे. कुस्ती शौकिनांना प्रत्यक्षात या लढती पाहता येणार नाहीत 17 जानेवारीला कुस्ती परिषदेच्या कार्यकारणीची सभेत स्पर्धेच्या तारखा पक्क्या होतील, अशी आशा आहे.    

राज्य सरकारने कोरोना संबधीत जारी केलेले आदेश आणि नियमांचे पालन करुन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाही पार पडेल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडामंत्री सुनिल केदार आणि क्रीडा आयुक्त डॉ. ओमप्रकाश बखोरिया यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजना संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला.


​ ​

संबंधित बातम्या