गंमत म्हणून महापौरांनी सुवर्णपदक दातात धरून मोडले; गोटाला मिळणार नवे पदक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 August 2021

सत्कार समारंभात गंमत म्हणून महापौरांनी सुवर्णपदक दातात धरून वाकवल्यामुळे जपानच्या सॉफ्ट बॉलमधील सुवर्णपदक विजेती खेळाडूला या खराब झालेल्या सुवर्णपदकाऐवजी दुसरे सुवर्णपदक बदलून दिले जाणार आहे.

टोकियो - सत्कार समारंभात गंमत म्हणून महापौरांनी सुवर्णपदक दातात धरून वाकवल्यामुळे जपानच्या सॉफ्ट बॉलमधील सुवर्णपदक विजेती खेळाडूला या खराब झालेल्या सुवर्णपदकाऐवजी दुसरे सुवर्णपदक बदलून दिले जाणार आहे.

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत जपानच्या संघाने सॉफ्ट बॉलचे सुवर्णपदक मिळवले. त्या संघातील खेळाडू मिऊ गोटा हिचा नागोया शहरात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या शहराचे महापौर ताकाशी कावामुला यांनी सहज आणि गंमत म्हणून गोटाचे सुवर्णपदक घेतले आणि मास्क खाली करून दातात धरले. त्यामुळे या पदकाचा आकारच बदलला आणि ते खराबही झाले.

आपल्याला नवे पदक द्यावे अशी गोटा हिची मागणी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीसह टोकियो ऑलिंपिक समितीनेही मान्य केली, याचा खर्च आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती करणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या