धावपटू मिल्खा सिंग झाले कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 June 2021

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून सर्वसाधारण विभागात हलवण्यात आले असल्याचे पीजीआयएमआर रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. ९१ वर्षीय मिल्खासिंग यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती.

चंडीगड - भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून सर्वसाधारण विभागात हलवण्यात आले असल्याचे पीजीआयएमआर रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

९१ वर्षीय मिल्खासिंग यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या पत्नी निर्मल कौर (८५) यांचा नुकताच मोहालीतील खासगी रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाला आहे. कौर या राष्ट्रीय हॉलीबॉल संघाच्या कर्णधार होत्या. ३ जून रोजी ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने सिंग यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते.


​ ​

संबंधित बातम्या