27 राष्ट्रीय संघटनांना मिळणार मान्यता ; क्रीडा मंत्रालयाचा निर्णय 

टीम ई-सकाळ
Thursday, 22 October 2020

क्रीडा मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत 27 राष्ट्रीय क्रीडा संघटना (एनएसएफ) मान्यता देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

क्रीडा मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत 27 राष्ट्रीय क्रीडा संघटना (एनएसएफ) मान्यता देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. क्रीडा मंत्रालयाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अ‍ॅथलीट्स, बॉक्सिंग आणि गोल्फसह 13 एनएसएफला या वर्षाच्या अखेर पर्यंत आपले पदाधिकारी निवडण्यास सांगितले गेले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मान्यता देण्यात आलेल्या 27 राष्ट्रीय क्रीडा संघटनांमध्ये प्रामुख्याने बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, हॉकी, स्विमिंग, सायकलिंग, नेमबाजी, टेबल टेनिस, स्क्वॅश, बास्केटबॉल, कबड्डी आणि फुटबॉलचा समावेश आहे.  

मेस्सीची स्वीट सिक्‍स्टीन कामगिरी

मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने क्रीडा मंत्रालयाच्या याचिकेवर आदेश देताना, क्रीडा संघटनांना मान्यता देण्यासाठी उच्च न्यायालयाची संमती घेणे आवश्यक नसल्याचे म्हटले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर क्रीडा मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने क्रीडा संघटनांना मान्यता देण्यापूर्वी संमती घेण्याचा आदेश दिला होता. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 50 सदस्यांचा संघ?

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने 24 जून रोजी कोर्टाच्या परवानगीशिवाय 57 एनएसएफला तात्पुरती मान्यता देण्याच्या मंत्रालयाच्या 2 जूनच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. सात फेब्रुवारी रोजी खंडपीठाने क्रीडा व विकास मंत्रालय आणि ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडियाला निर्देश देताना ते कोर्टाची परवानगी न घेता एनएसएफशी संबंधित कोणताही निर्णय घेणार नसल्याचे सांगितले होते.      

 

 


​ ​

संबंधित बातम्या