बुद्धिबळ प्रेमींना  एप्रिल फूलचा ‘शह’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 April 2021

बुद्धिबळ खेळात कोणताही बदल होण्यापूर्वी त्याबाबत खेळाडू आणि प्रशिक्षकांसह चर्चा होते आणि त्याबाबतचा अंतिम निर्णय जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या बैठकीत होतो. एवढेच नव्हे तर बरोबरी हा खेळातील कौशल्याचा एक भाग आहे.

मुंबई : जागतिक बुद्धिबळाच्या नियमात बदल झाला असून आता बरोबरीचा निकाल लागणार नाही असे वृत्त पसरल्याने एकच खळबळ माजली, पण काही वेळातच हा केवळ एप्रिल फूलचा शह असल्याची ग्वाही बुद्धिबळ अभ्यासकांनी दिली.  बुद्धिबळ खेळात कोणताही बदल होण्यापूर्वी त्याबाबत खेळाडू आणि प्रशिक्षकांसह चर्चा होते आणि त्याबाबतचा अंतिम निर्णय जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या बैठकीत होतो. एवढेच नव्हे तर बरोबरी हा खेळातील कौशल्याचा एक भाग आहे.

2011 चा वर्ल्ड कप जिंकून उपकार केले नाहीत : गौतम गंभीर

खेळाचे माफक ज्ञान असलेल्यांना काही परिस्थितीत निकाल अशक्‍य असल्याची जाणीव असते, याकडे बुद्धिबळ अभ्यासकांनी लक्ष वेधले. बुद्धिबळातील पेनल्टी शूटआऊट समजल्या जाणाऱ्या आर्मेगेदॉन डावात पांढरी मोहरे असलेल्या खेळाडूस काळी मोहरी असलेल्या खेळाडूपेक्षा जास्त वेळ असतो, पण लढत बरोबरीत सुटल्यास काळी मोहरे असलेला खेळाडू विजयी होतो. मात्र याची अंमलबजावणी होणाऱ्या स्पर्धेतही या डावावर निकाल लागल्यास पराभूत खेळाडूस गुण मिळतात. दरम्यान, हा एप्रिल फूलचा शह दिलेल्या चेस डॉट कॉम संकेतस्थळातील सूत्रांनी आम्ही एप्रिल फूल केले आहे. त्याची माहीती २ एप्रिलला देणार असल्याचे सांगितले.
 


​ ​

संबंधित बातम्या