स्पर्धकांचा कस पाहणाऱ्या स्पर्धेत मिश्र शर्यतही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 July 2021

ॲथलेटिक्सला सर्वच खेळांची जननी मानले जाते. ग्रीसमध्ये होत असलेल्या प्राचीन ऑलिंपिक स्पर्धा असो किंवा १८९६ पासून सुरू झालेल्या आधुनिक ऑलिंपिक त्यात ॲथलेटिक्सचा सहभाग आहेच.

ॲथलेटिक्सला सर्वच खेळांची जननी मानले जाते. ग्रीसमध्ये होत असलेल्या प्राचीन ऑलिंपिक स्पर्धा असो किंवा १८९६ पासून सुरू झालेल्या आधुनिक ऑलिंपिक त्यात ॲथलेटिक्सचा सहभाग आहेच. अतिवेगवान शर्यत, लांब अंतराची शर्यत, चालण्याची स्पर्धा, फेकीच्या स्पर्धा, लांब असो वा उंच उडी, त्यात बदल झाले, पण खेळाचा मूळ गाभा कायम राहिला आहे.

१९२८ मध्ये प्रथम महिलांच्या स्पर्धा सुरू झाल्या आणि काळाच्या ओघात त्यातील स्पर्धा शर्यतींची ट्रॅक, फिल्ड आणि रोड या प्रकारात विभागणी झाली. कोणत्याही स्पर्धात शंभर मीटरची शर्यत सर्वाधिक चर्चेची राहते. केवळ काही सेकंदात संपणाऱ्या या शर्यतीची लोकप्रियता कमालीची आहे. 

पदके किती - पुरुषांमध्ये २४ स्पर्धा शर्यती होतील, तर महिलांमध्ये ५० किलोमीटर चालण्याची स्पर्धा नसल्यामुळे या विभागात २३ सुवर्णपदकांसाठी चुरस असते. याचबरोबर ४ बाय ४०० मीटरची मिश्र रिलेची स्पर्धाही होणार आहे. 

रिओत काय झाले - उसेन बोल्टने १०० आणि २०० मीटरची जिंकलेली शर्यत सर्वाधिक आकर्षक ठरली. मात्र सर्वात लक्षवेधक होती ती इथिओपियाच्या अल्माझ अयानाची कामगिरी. तिने दहा हजार मीटर शर्यत जिंकताना २९ मिनिटे १७.४५ सेकंद वेळ दिली. तिने चीनच्या वँग जुनझिआ हिने २३ वर्षांपूर्वी केलेला विक्रम १५ सेकंदांनी मागे टाकला होता. अल्माझ जिंकत असताना पहिल्या तेरा जणींनी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली, तसेच आठ जणींनी राष्ट्रीय विक्रम केले होते.

टोकियोत काय - शंभर मीटर शर्यतीत प्रथमच नवा विजेता लाभण्याची दाट शक्यता. १७ वर्षांपूर्वी अथेन्सचा विजेता ३९ वर्षीय जस्टीन गॅटलीनच्या सहभागाची शक्यता अमेरिकेतील स्पर्धेतील अपयशामुळे संपली. 
नवे काय - ४ बाय ४०० मीटर रिले. दोन पुरुष आणि दोन महिलांचा सहभाग असलेली ही शर्यत. त्यात वेगवेगळे पर्याय वापरण्याचा प्रयोग सुरुवात झाला. पण आता पुरुष-महिला - महिला - पुरुष ही क्रमवारी जवळपास ठरली आहे.

कालावधी - ३० जुलै ते ८ ऑगस्ट
स्पर्धा कुठे - प्रमुख शर्यती ऑलिंपिकच्या परंपेरनुसार मुख्य ऑलिंपिक स्टेडियमवर होतील, तर मॅरेथॉन तसेच चालण्याची स्पर्धा टोकियोतील उष्णतेमुळे साप्पोरो येथे होईल. 

भारतीय आव्हान - नीरज चोप्रा भालाफेक स्पर्धेत भारतास अॅथलेटिक्समधील पहिले पदक जिंकून देण्याची शक्यता आहे. अविनाश साबळे, श्रीशंकर, कमलप्रीत, ताजिंदर आव्हान निर्माण करू शकतात.

जाता - जाता - पुरुषांच्या स्पर्धा शर्यतीत सत्तर वर्षांत फारसा बदल झाला नाही. सुरुवातीच्या स्पर्धांत काही शर्यतीत महिला स्पर्धक खाली पडल्यामुळे त्या स्पर्धांचा विरोध वाढला, पण १९६० पासून पुन्हा सर्व स्पर्धा शर्यती सुरू झाल्या. आता टोकियोतील एकूण अॅथलीटस््पैकी ४९ टक्के स्पर्धक महिला आहेत.


​ ​

संबंधित बातम्या