सुवर्णयुगाची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 July 2021

काही दशकांपर्यंत ऑलिंपिक म्हणजे भारताचे हॉकीतील सुवर्णपदक अशीच कहाणी होती. अर्थात हॉकी ॲस्ट्रोटर्फवर आली आणि चित्र बदलत गेले ते २००८ च्या ऑलिंपिकला भारताची अपात्रता होईपर्यंत. असो. ऑलिंपिक हॉकी स्पर्धेत पुरुष तसेच महिलांच्या स्पर्धेत प्रत्येकी १२ संघ असतील.

काही दशकांपर्यंत ऑलिंपिक म्हणजे भारताचे हॉकीतील सुवर्णपदक अशीच कहाणी होती. अर्थात हॉकी ॲस्ट्रोटर्फवर आली आणि चित्र बदलत गेले ते २००८ च्या ऑलिंपिकला भारताची अपात्रता होईपर्यंत. असो. ऑलिंपिक हॉकी स्पर्धेत पुरुष तसेच महिलांच्या स्पर्धेत प्रत्येकी १२ संघ असतील. दोन गटांतील अव्वल चार संघ बाद फेरीत प्रवेश करतील. प्रत्येक संघात ११ खेळाडू असतात, पण हवे तेवढे आणि हवे तेव्हा बदल करता येतात. वो सत्तर मिनिट असलेला हॉकीचा सामना ६० मिनिटांचा असतो. त्यात १५ मिनिटांची चार सत्रे असतात. १९०८ च्या लंडन ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदा हॉकीचा समावेश करण्यात आला. १९१२ आणि १९२४ चा अपवाद वगळता प्रत्येक स्पर्धेत या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे. १९८० च्या मॉस्को स्पर्धेपासून महिलांची स्पर्धा सुरू झाली.

पदके किती - पुरुष तसेच महिलांच्या स्पर्धेत प्रत्येकी एक सुवर्णपदक.
रिओत काय घडले -
अर्जेंटिनाने पुरुषांचे सुवर्णपदक जिंकत सर्वांना धक्का दिला. त्यांनी बेल्जियमला पराजित करीत ऑलिंपिक हॉकीतील सुवर्णपदक प्रथमच दक्षिण अमेरिकेत नेले. ब्रिटनने संभाव्य विजेत्या नेदरलँड्सला शूटआउटमध्ये पराजित करून महिलांच्या स्पर्धेत बाजी मारली. ब्रिटनने ही स्पर्धा पहिल्यांदाच जिंकली होती.
टोकियोत काय - गतविजेत्या अर्जेंटिना सोबतच विश्वकरंडक विजेती बेल्जियमही अव्वल दावेदार असेल. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, नेदरलँड्स तसेच भारताचेही कडवे आव्हान राहील. महिलांच्या स्पर्धेत ब्रिटन आणि नेदरलँड्स यांच्यात कडवी चुरस होण्याची शक्यता आहे.
नवीन काय - जपान १९६८ च्या मेक्सिको सिटी स्पर्धेस पहिल्यांदा पात्र ठरले होते. त्यानंतर प्रथमच ते या स्पर्धेत खेळणार आहेत, पण ते केवळ यजमान असल्यामुळे.
कालावधी - २४ जुलै ते ६ ऑगस्ट

स्पर्धा कधी - टोकियो बे जवळील ऑई हॉकी स्टेडियममध्ये.
भारतीय आव्हान - भारतीय पुरुष संघ जागतिक क्रमवारीत पाचवा आहे. त्याला पदकाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. महिला संघासाठी आव्हान खूपच खडतर असेल.
जाता जाता - हॉकी स्पर्धेतील लढती सकाळी तसेच संध्याकाळी होतील. टोकियोतील वाढत्या उष्णतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हॉकी लढती होणारे स्टेडियम हे विमानतळापासून पाच किलोमीटरवरच आहे. दुपारच्या वेळी टोकियोहून हानेदा विमानतळाकडे जाणाऱ्या विमानांच्या प्रवासाचा कोणताही अडथळा येऊ नये हा विचारही करण्यात आला आहे.


​ ​

संबंधित बातम्या