ऑलिम्पिक पात्रता कुस्ती चीनऐवजी कझाकस्तानला 

संजय घारपुरे
Wednesday, 23 December 2020

टोकियो ऑलिंपिक क्रीडा कुस्ती स्पर्धेस पात्र ठरण्यासाठी भारतीय कुस्तीगीरांना चीनला जाण्याची वेळ येणार नाही. ही स्पर्धा चीनऐवजी कझाकस्तानला घेण्याचा निर्णय जागतिक कुस्ती महासंघाने घेतला आहे. 

मुंबई : टोकियो ऑलिंपिक क्रीडा कुस्ती स्पर्धेस पात्र ठरण्यासाठी भारतीय कुस्तीगीरांना चीनला जाण्याची वेळ येणार नाही. ही स्पर्धा चीनऐवजी कझाकस्तानला घेण्याचा निर्णय जागतिक कुस्ती महासंघाने घेतला आहे. 

जागतिक बुद्धिबळात भारतास तीन सुवर्ण 

जागतिक महासंघाने नव्या वर्षातील वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धा 9 ते 11 एप्रिलदरम्यान अल्माटी येथे होईल. यापूर्वीच्या कार्यक्रमानुसार ही स्पर्धा 26 ते 28 मार्चदरम्यान झिआन (चीन) येथे होणार होती. जागतिक महासंघाने स्पर्धा सहभागावरील खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी आशियाई ऑलिंपिक स्पर्धा आणि आशियाई स्पर्धा एकाच ठिकाणी लागोपाठ घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अल्माटीत मूळ कार्यक्रमानुसार 16 ते 21 फेब्रुवारीदरम्यान होणारी आशियाई कुस्ती स्पर्धा आता 12 ते 17 एप्रिलदरम्यान होईल. 

सिंधूचा थायलंड स्पर्धा सहभाग संकटात?

आशियाई ऑलिंपिक पात्रतेद्वारे टोकियोचे तिकीट न मिळवलेल्या कुस्तीगीरांसाठी अखेरची संधी मे महिन्यात असेल. बल्गेरियात 6 ते 9 मे दरम्यान जागतिक ऑलिंपिक पात्रता स्पर्धा होईल. दरम्यान, रोममध्ये जानेवारीत होणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्याचाही निर्णय झाला आहे. 

भारतीय कुस्तीगीरांचा अपेक्षित चाचणी कार्यक्रम 
- 4 ते 7 मार्च : जागतिक मानांकन कुस्ती, इटली 
- 9 ते 11 एप्रिल : आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धा, कझाकस्तान 
- 12 ते 17 एप्रिल : आशियाई स्पर्धा 
- 6 ते 9 मे : जागतिक ऑलिंपिक पात्रता स्पर्धा, बल्गेरिया


​ ​

संबंधित बातम्या