नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ऑलिम्पिक टेस्ट टूर्नामेंटचा विचार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजकांनी पुढील वर्षीच्या सुरवातीला ऑलिम्पिक टेस्ट टूर्नामेंट घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजकांनी पुढील वर्षीच्या सुरवातीला ऑलिम्पिक टेस्ट टूर्नामेंट घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मागील आठवड्यात झालेल्या जिम्नॅस्टिक्स स्पर्धेला प्रोत्साहन मिळाल्यामुळे आगामी वर्षाच्या सुरवातीला टेस्ट टूर्नामेंट आयोजित करणे शक्य असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. 

रेयालची तीन गोलच्या फरकाने हार

रविवारी झालेल्या जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत 22 रशियन, चिनी आणि अमेरिकन खेळाडू यांनी सहभाग नोंदवला होता. शिवाय या स्पर्धेसाठी हजारो प्रेक्षक देखील उपस्थित होते. या स्पर्धेनंतर टोकियो ऑलिम्पिक खेळांचे वितरण अधिकारी नाकामुरा यांनी मार्च मध्ये टेस्ट टूर्नामेंट आयोजित करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. मात्र या टेस्ट टूर्नामेंट मध्ये जपान व्यतिरिक्त इतर देशांतील खेळाडूदेखील सहभागी होऊ शकतील काय हे त्यांनी स्पष्ट सांगितलेले नाही. तसेच यासंबधित जपान सरकार आणि टोकियोच्या स्थानिक प्रशासनासोबत कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी योजना आखण्याचे काम चालू असल्याचे नाकामुरा यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढील वर्षी मार्च महिन्यात टेस्ट टूर्नामेंट आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.  

माजी भारतीय फुटबॉलपटू सत्यजित घोष यांचे निधन 

जिम्नॅस्टिक्स स्पर्धेपूर्वी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीत सर्व खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांचे अहवाल नकारात्मक आले होते. आणि शिवाय या सर्वांना स्पर्धेपूर्वी क्वारंटाईन करण्यात आले होते. आणि त्यांची रोज नियमित कोरोना चाचणी करण्यात येत होती. याव्यतिरिक्त टोकियो ऑलिम्पिकचे अधिकारी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) आणि जपान सरकार हे पुढे ढकलण्यात आलेली स्पर्धा 23 जुलैपासून आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या