महिलांच्या बडबडीवरील वक्तव्य नडले; ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षांचा राजीनामा

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 12 February 2021

ऑलिम्पिक आयोजन समितीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीवेळी त्यांनी हा मोठा निर्णय घेतला.

Olympics 2021 Yoshiro Mori Resign :  टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष  योशिरो मोरी यांना महिलाविरोधी वक्तव्य चांगलेच भोवले आहे. महिलांसंदर्भात आपत्तीजनक टिप्पणीमुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.  काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक वक्तव्य केले होते.

महिलांमध्ये प्रतिस्पर्ध्याची भावना असते. त्यामुळे त्या अधिक बडबड करतात, अशा आशयाचे वक्तव्य योशिरो मोरी यांनी केले होते. 83 वर्षीय माजी पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर जपानमध्ये लैंगिक समानतेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर आता अखेर त्यांनी पदाचा राजीनामा दिलाय. 

धर्माच्या आधारावर सिलेक्शनचा वाद; कुंबळे-पठाण या दिगज्जांनी दिला जाफरला पाठिंबा

ऑलिम्पिक आयोजन समितीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीवेळी त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. बैठकीत ते म्हणाले की, मी अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहेत. लवकरात लवकर माझा उत्तराधिकाऱ्याची तुम्ही लोक निवड कराल. महिलांसदर्भातील वक्तव्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती. मात्र प्रसारमाध्यमातून होणारी टीका आणि त्यांच्या विरोधात सुरु झालेली ऑनलाईन मोहिम यामुळे त्यांच्यावर अध्यक्षपद सोडण्याची नामुष्की ओढावली. 

जाफरसंदर्भातील धार्मिक वादाच्या प्रश्नावर अजिंक्यनं घेतला सावध पवित्रा 

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 84 वर्षीय साबुरो काबाबुची यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. काबाबुची हे माजी फुटबॉल खेळाडू आहेत. जपानमधील क्रीडा विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यापूर्वी बजावलीय. 1964 मध्ये त्यांनी ऑलिम्पिकमध्ये जपानच्या संघाकडून प्रतिनिधीत्व केले होते.  

 


​ ​

संबंधित बातम्या