मंजुरीनंतरही प्रेक्षकांविना ऑलिंपिक?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 June 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत क्षमतेच्या ५० टक्के अथवा जास्तीत जास्त १० हजार प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय ऑलिंपिक संयोजन समितीने जाहीर केला, पण त्याच वेळी कोरोनाचे जपानमधील रुग्ण वाढले, पुन्हा आणीबाणी अमलात आली.

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत क्षमतेच्या ५० टक्के अथवा जास्तीत जास्त १० हजार प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय ऑलिंपिक संयोजन समितीने जाहीर केला, पण त्याच वेळी कोरोनाचे जपानमधील रुग्ण वाढले, पुन्हा आणीबाणी अमलात आली, तर स्पर्धा प्रेक्षकांविना होईल, असे स्पष्ट प्रतिपादन जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी केले.

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचे संयोजन प्रेक्षकांसह व्हावे अशी माझीही इच्छा आहे; मात्र त्याच वेळी प्रेक्षकांविना स्पर्धा होण्याची शक्यताही सुगा यांनी व्यक्त केली. 

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, संयोजन समिती, टोकियो प्रशासन, जपान सरकार, प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत चर्चा करीत असतानाच सुगा यांनी ही टिप्पणी केली. लसीकरण केंद्रास भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


​ ​

संबंधित बातम्या