युगांडा संघातील खेळाडूही आता कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 June 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा संयोजनामुळे जपानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतील, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यातच युगाडा संघातील मार्गदर्शकांपाठोपाठ खेळाडूही कोरोनाबाधित ठरल्यामुळे स्पर्धा किती सुरक्षित असेल, हा प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे.

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा संयोजनामुळे जपानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतील, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यातच युगाडा संघातील मार्गदर्शकांपाठोपाठ खेळाडूही कोरोनाबाधित ठरल्यामुळे स्पर्धा किती सुरक्षित असेल, हा प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे. 

जपानमध्ये बुधवारी ६१९ कोरोनाबाधित आढळले. गेल्या आठवड्यांच्या तुलनेत त्यात ११९ ने वाढ झाली आहे. ऑलिंपिकला येणारे खेळाडू, तसेच पदाधिकाऱ्यांचा मुक्काम क्रीडानगरीत असेल, त्यामुळे त्यांच्यापासून कोणासही कोरोनाची लागण होणार नाही, हा संयोजकांचा दावा जपानमधील तज्ज्ञांना मान्य नाही. 

ऑलिंपिकपूर्व सरावासाठी युगांडाचा संघ जपानमध्ये आला आहे. संघातील प्रत्येकाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र जपानमध्ये दाखल होताच झालेल्या चाचणीत संघाचे मार्गदर्शक बाधित आढळले.


​ ​

संबंधित बातम्या